शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मळ साचून मुलांची मान, हाताचे कोपरे काळे पडले? १ सोपा उपाय- ५ मिनिटांत दिसतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 18:52 IST

1 / 6
उन्हाळ्याच्या मुलांमध्ये मुलांनी मनसोक्त धिंगाणा घातला. भरपूर खेळून झाले. आता मात्र शाळा सुरू होणार आहे. उन्हाळ्यात भरपूर झालेले खेळणे आणि त्या दिवसांत येणारा खूप घाम यामुळे बऱ्याच मुलांची मान काळवंडून जाते. त्याच बरोबर हाताचे कोपरे आणि गुडघेही काळवंडून जातात.
2 / 6
आता शाळा सुरू होणार म्हटल्यावर मुलांना पुन्हा एकदा स्वच्छ करणं गरजेचंच आहे. त्यासाठीच हा एक सोपा घरगुती उपाय पाहा. अगदी ५ ते ७ मिनिटांत मुलांची मान, कोपरे, घोटे आणि गुडघे स्वच्छ होऊन जातील.
3 / 6
कित्येक मोठ्या माणसांचीही मान खूप काळी पडलेली असते. मान, हाताचे कोपरे, पायाचे घोटे, गुडघे काळवंडलेले असतील तर ते खूपच अस्वच्छ वाटते. हा उपाय अशा लोकांसाठीही खूप उपयुक्त ठरणार आहे.
4 / 6
हा उपाय करण्यासाठी लिंबू घ्या आणि ते मधोमध कापा. लिंबाच्या अर्ध्या कापलेल्या फोडीवर हळद घाला.
5 / 6
त्यावरच थोडी कॉफी आणि थोडे खोबरेल तेल घालावे. कॉफीचा स्क्रब म्हणून खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे त्वचा लगेच स्वच्छ होण्यास मदत होते.
6 / 6
त्या लिंबाच्या फोडीवरच कोणताही माईल्ड शाम्पू २ ते ३ थेंब घाला आणि आता ही फोड काळवंडलेल्या मानेवर, पाठीवर, गुडघ्यांवर घासा. खूप जोरात घासण्याची गरज नाही. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. टॅनिंग, डेड स्किन निघून जाईल आणि मान, गुडघे, हाताचे कोपरे अगदी स्वच्छ होतील.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीkidsलहान मुलंSchoolशाळा