1 / 6हल्ली लहान मुलांचे केसही खूप गळू लागले आहेत. मुलांच्या नाजुक केसांना इतर काेणते केमिकल्स असणारे प्रोडक्ट लावण्याचीही भितीच वाटते..(how to reduce hair loss in kids?)2 / 6म्हणूनच जावेद हबीब यांनी एक खास उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी १ चमचा मेथी दाणे घ्या आणि ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.(simple tips and tricks to control hair fall in kids by Javed Habib)3 / 6दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेले मेथी दाणे आणि थोडंसं दही एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या. 4 / 6आता हा लेप मुलांच्या डोक्याला केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा. केस गळण्याचं प्रमाण कमी होईल. 5 / 6त्याचबरोबर जावेद हबीब यांनी आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इतर कोणतंही तेल मुलांच्या केसांना लावण्यापेक्षा आठवड्यातून एकदा साजुक तूप लावून मसाज करा... यामुळे मुलांचे केस दाट होऊन गळणंही कमी होतं.6 / 6याशिवाय मुलांच्या आहाराकडेही पालकांनी व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. आहारातून पौष्टिक पदार्थ पुरेशा प्रमाणात मिळाल्यास केस गळण्याचं प्रमाण निश्चितच कमी होऊ शकतं.