शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उंच मुलींसाठी ५ ब्लाऊज डिझाइन्स-साडी नेसली की मिळेल एकदम दीपिका-कतरिनासारखा स्टायलिश हॉट लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 20:00 IST

1 / 7
आपण नेहमीच दीपिका पदुकोण किंवा कतरिना कैफ यांसारख्या बॉलीवूड अभिनेत्रींच्या साडी लूकचे कौतुक करतो. पण त्यांच्या सौंदर्याचे गुपित ब्लाऊजच्या परफेक्ट डिझाईनमध्ये असते. जर आपली उंची असेल, तर आपणही साध्या कॉटन साडीवरही एखाद्या मॉडेलसारखे 'स्टायलिश' दिसू शकता.
2 / 7
आपणही उंच असू तर ५ अशा खास ब्लाऊज डिझाइन्स पाहूया. ज्यामुळे आपल्या सौंदर्याच भर पडेल. लग्नसमारंभ असो वा ऑफिसची मीटिंग, हे पॅटर्न तुम्हाला गर्दीत वेगळे ठरवतील.
3 / 7
उंच मुलींची मान सहसा लांब असते. हाय-नेक किंवा बंद गळ्याचे ब्लाऊज आपल्या मानेला अतिशय सुंदर आकार देतात. यामुळे आपल्याला प्रोफेशनल आणि रॉयल लूक मिळतो.
4 / 7
कोपऱ्यापर्यंत बाह्या असलेले ब्लाऊज उंच मुलींवर खूप शोभून दिसतात. यामुळे आपले हात अधिक बारीक आणि स्टायलिश दिसतात. एल्बो लेंथ स्लीव्हज असलेले सिल्क आणि बनारसी साडीवर हा पॅटर्न खुलून दिसतो.
5 / 7
हॉल्टर नेक ब्लाऊज आपल्याला बोल्ड आणि मॉर्डन लूक देतात. यामुळे आपले खांदे रुंद आणि उंची यामुळे हा लूक अतिशय 'ग्लॅमरस' वाटतो.
6 / 7
उंच मुलींचे पाठ आणि खांदे सुटसुटीत असतात. त्यामुळे स्लीव्हलेस बॅकलेस, डीप बॅक किंवा बॅकलेस ब्लाऊजमध्ये आपण हॉट दिसू शकतो.
7 / 7
रुंद खांदे असलेल्या उंच मुलींसाठी बोट नेक हा सर्वात सुरक्षित आणि सुंदर पर्याय आहे. यामुळे आपल्या साडीचा लूक सोबर आणि एलिगंट वाटतो.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिला