शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

प्रेम म्हणजे..नक्की काय असतं, महागडं गिफ्ट की रोमॅण्टिक मेसेज? खरंखुरं प्रेम ओळखण्यासाठी ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 21:00 IST

1 / 8
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम नसतं. असं आपण बरेचदा ऐकतो. पण सध्याच्या सिच्युएशनशिप, लव्ह बॉम्बिंग आणि घोस्टिंगच्या जमान्यात खरं प्रेम शोधणं म्हणजे तारेवरची कसरतच. इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबत रील पोस्ट करणे, महागड्या कॅफेमध्ये डेट्सला जाणे किंवा स्नॅपचॅटवर रोज स्ट्राईक टिकवणे म्हणजे प्रेम, अशी प्रेमाची व्याख्या आजकालच्या सोशल मीडिया जनरेशनने करून ठेवली आहे.(How to know if your love is real or fake)
2 / 8
सुरुवातीला खूप छान वाटणारा हा ड्रामा काही दिवसांतच मानसिक शांतता हिरावून घेते. जेव्हा नात्यातली सुरुवातीची 'Honeymoon Phase' संपते, तेव्हा खऱ्या प्रेमाची कसोटी लागते. जर आपलाही जोडीदार आपल्यावर खरं प्रेम करत असेल तर ते कसं ओळखायचं पाहूया. (Psychological signs of true love in a relationship)
3 / 8
खरं प्रेम आपल्याला टेन्शन देत नाही. तर मानसिक शांतता देतं. आपल्याला पार्टनरसोबत असताना किंवा त्याच्याशी बोलताना सतत असुरक्षित वाटत असेल. तो कोणाशी बोलतोय या विचाराने आपल्या मनात संशय येत असेल, तर तिथे प्रेम कमी आणि टॉक्सिसिटी जास्त आहे. रिअल पार्टनर आपल्या मनात कधीच भीती किंवा संशय निर्माण होऊ देत नाही. त्याच्यासोबत असताना आपल्याला अत्यंत सुरक्षित आणि रिलॅक्स वाटतं.
4 / 8
खरं प्रेम आपल्याला बदलायला भाग पाडत नाही. ते आपल्याला जसं आहे तसं स्वीकारतं. आपली पर्सनॅलिटी कमी करत नाही तर ती नव्याने उजळते.
5 / 8
प्रेमाच्या व्याख्या अनेक असल्या तरी ते आपल्याला कधी घाबरवत नाही किंवा कमी देखील लेखत नाही. आपला पार्टनर आपल्याला सोडून जाईल का? अशी भीती नसते तर त्याच्यासोबत कायम सुरक्षित वाटतं.
6 / 8
मी तुझ्यावर प्रेम करतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं रोज सांगत नाही. पण त्याच्या प्रत्येक कृतीमधून आपल्याला खरेपणाचा किंवा आपलेपणाचा ओलावा पाहायला मिळतो. ते खरं प्रेम असतं.
7 / 8
जर आपल्याला योग्य जोडीदार मिळाला तर तो कायम पुढे जाण्यासाठी सपोर्ट करतो. आपली आर्थिक आणि मानसिक प्रगती कशी होईल यावर अधिक भर देतो. आपल्या पार्टनरला याबद्दल कायम अभिमान वाटतो.
8 / 8
आपला पार्टनर आपल्या यशात किती खुश होतो, यावरुन त्याचं प्रेम ओळखता येतं. जेव्हा आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं मिळतं, तेव्हा त्याच्या मनात कोणतीही स्पर्धा किंवा जेलसी नसते. त्यावेळी आपला पार्टनर हा आपला खरा चिअरलीडर असतो. आपल्या स्वप्नांवर हसण्याऐवजी, ती पूर्ण करण्यासाठी जो स्वतःहून पाठीशी उभा राहतो, तोच आपला खरा 'सोलमेट' असतो.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपMental Health Tipsमानसिक आरोग्य