शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मोगऱ्यावर शिंपडा 'हा' घरगुती स्प्रे, पान दिसणार नाही इतक्या येतील कळ्या- रोज काढा परडीभर फुलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 12:36 IST

1 / 6
मार्च ते नोव्हेंबर हा माेगऱ्याचा हंगाम असतो. या दिवसांत मोगऱ्याची व्यवस्थित काळजी घेतली तर त्याला भरपूर कळ्या आणि फुलं येतात...
2 / 6
त्यामुळेच तुमच्या घरच्या मोगऱ्यालाही भरपूर कळ्या याव्या, सुगंधित फुलांनी तुमचं घर भरून जावं यासाठी पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा.. बघा काही दिवसांतच मोगरा कसा बहरून जातो..
3 / 6
पहिली गोष्ट म्हणजे एव्हाना मोगऱ्याच्या रोपाची कटिंग व्हायला हवी होती. पण नसेल झाली तर अगदी आताच लगेच मोगऱ्याची कटिंग करा. कटिंग करताच त्याला कित्येक नव्या फांद्या फुटतील. रोप बहरेल आणि त्याला कळ्याही चांगल्या येतील.
4 / 6
चहा गाळून घेतल्यानंतर गाळणीमध्ये उरलेली चहा पावडर स्वच्छ धुवून वाळवून घ्या आणि मग ती मोगऱ्याच्या कुंडीतल्या मातीत घाला. माती छान भुसभुशीत आणि कसदार होईल. हा उपाय १५ दिवसांतून एकदा करा.
5 / 6
केळीची सालं वाळवून त्यांची पावडर करून घ्या. ही पावडर दर ८ दिवसांनी मोगऱ्याच्या कुंडीतल्या मातीत घाला. किंवा मग केळीचं सालं पाण्यात भिजत घाला. १० ते १२ तासांनी पाणी गाळून घ्या. त्यात आणखी थोडं साधं पाणी घाला आणि हे पाणी मोगऱ्याला द्या. फुलं भरपूर येतील आणि त्यांचा आकारही छान टपोरा होईल.
6 / 6
१ लीटर पाण्यात १ चमचा एप्सम सॉल्ट मिसळा. हे पाणी मोगऱ्याच्या रोपावर शिंपडा. तसेच कुंडीतल्या मातीमध्येही घाला. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा.. मोगरा छान बहरेल.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सSummer Specialसमर स्पेशलPlantsइनडोअर प्लाण्ट्सWaterपाणीFlowerफुलं