शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बीपी, शुगर, सांधेदुखी ही दुखणी तुमच्याकडे फिरकणारच नाहीत.. रोज सकाळी उपाशीपोटी फक्त 'हे' काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 13:44 IST

1 / 9
हल्ली प्रत्येकाच्याच मागचा कामाचा ताण खूप वाढला आहे. त्यातच आपला आहार, दिनचर्या या सगळ्याच गोष्टी खूप बदललेल्या आहेत. याचा वाईट परिणाम आरोग्यावर होत असून कमी वयातच वेगवेगळी दुखणी मागे लागत आहेत.
2 / 9
त्यामुळेच तर कमी वयातच अनेकांना बीपी, शुगर, जॉईंटपेन, लठ्ठपणा असे त्रास होत आहेत. हे त्रास तुम्हाला नको असतील तर पुढे सांगितलेला एक खास उपाय रोज सकाळी काही दिवस नियमितपणे करून पाहा.. यामुळे आरोग्याच्या कित्येक तक्रारी दूर होऊ शकतात.
3 / 9
dr.poorneshwar_sawant या इंस्टाग्राम पेजवर डॉक्टरांनी माहिती शेअर केली असून यामध्ये ते सांगतात की रोज सकाळी भिजवलेल्या मेथ्या उपाशीपोटी खायला हव्या. रात्री झोपण्यापुर्वी चमचाभर मेथ्या स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्या वाटीमध्ये पाणी टाकून भिजत ठेवा. सकाळी या मेथ्या सगळ्यात आधी खा.
4 / 9
यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही हा उपाय चांगला आहे.
5 / 9
ज्या लोकांना कोलेस्टेरॉलचा त्रास असतो, त्यांचा हा त्रास नियंत्रित ठेवण्यासाठीही भिजवलेल्या मेथ्या खाणं खूप फायदेशीर ठरतं.
6 / 9
भिजवलेल्या मेथ्या नियमितपणे खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
7 / 9
चयापचय क्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच शरीरावर अतिरिक्त चरबी साचून राहाणे कमी होते आणि वेट मॅनेजमेंटसाठीही त्याचा फायदा होतो.
8 / 9
भिजवलेल्या मेथ्या खाल्ल्यामुळे अंगावरील सूज कमी होते आणि हाडांना बळकटी मिळून सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.
9 / 9
पण हा उपाय सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरेल असे नाही. त्यामुळे आधी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतरच हा उपाय सुरू करा. शिवाय ज्या लोकांना पित्ताचा त्रास असतो, त्यांनी हा उपाय करू नये, असंही डॉक्टर सांगतात.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह