शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आपल्या चेहऱ्यासाठी कोणता फेसमास्क योग्य हे कसं निवडाल? हे घ्या सोपं उत्तर, चेहऱ्यावर करा जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 12:14 PM

1 / 7
त्वचेचा टाईटनेस व्यवस्थित टिकून राहावा आणि ती तरुण दिसावी तसेच त्वचेवर छान चमक यावी यासाठी फेसपॅक किंवा फेसमास्क लावण्याचा सल्ला दिला जातो.
2 / 7
बाजारात फेसमास्क किंवा फेसपॅकचे कित्येक प्रकार मिळतात. पण त्यापैकी आपल्या त्वचेसाठी योग्य पॅक किंवा मास्क कसा निवडायचा हा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो.
3 / 7
कारण आपल्या त्वचेला सूट न होणारा चुकीचा फेसपॅक लावल्यास त्वचेवर काहीच फरक दिसत नाही. म्हणूनच अशी चुकीची निवड करून पैसे वाया घालविण्यापेक्षा आपल्या त्वचेनुसार योग्य फेसपॅकची निवड कशी करायची ते पाहा.. याविषयीची माहिती anupriyaa_srivastavaa या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
4 / 7
जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि त्यावर ॲक्ने, पिंपल्स असतील तर अशा त्वचेसाठी क्ले मास्क चांगला आहे.
5 / 7
दुसरा प्रकार आहे शीट मास्क. हा मास्क प्रत्येक स्किन टाईपसाठी चांगला मानला जातो. या मास्कमुळे त्वचा हायड्रेटेड होण्यास मदत होते.
6 / 7
बाजारात मिळणारा क्रिम मास्क ड्राय त्वचेसाठी उत्तम आहे. कारण त्यातलं क्रिम त्वचेला मॉईश्चराईज करून त्वचेचा ड्रायनेस कमी करण्यास मदत करतं.
7 / 7
चारकोल मास्क त्वचा स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे. पण त्यांचा वारंवार वापर टाळावा. कारण हा मास्क त्वचेतलं नॅचरल ऑईल काढून घेतो. त्यामुळे अगदी क्वचितच या मास्कचा वापर करा, असा सल्ला त्या व्हिडिओमध्ये दिला आहे.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडी