कमी वयातच पांढरे केस नको ना? 'हा' उपाय करा- केस होतील काळेभोर, चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 09:20 IST2025-09-12T09:16:51+5:302025-09-12T09:20:01+5:30

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. केस कमी वयात पांढरे झाले की आपोआपच आत्मविश्वासही कमी होतो.

म्हणूनच केस पांढरे होऊ नयेत यासाठी काही गोष्टींची अगदी सुरुवातीपासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढे सांगितलेला एक हेअरमास्क आठवड्यातून एकदा लावून पाहा.

हा हेअरमास्क तयार करण्यासाठी अव्हाकॅडोचा गर काढून घ्या. त्यामध्ये एक ते दिड चमचा खोबरेल तेल टाका. अव्हाकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात बायोटीन असतं जे केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतं.

त्यानंतर या मास्कमध्ये एक ते दिड चमचा मध घाला. मधामुळे केसांना पोषण मिळतं. केसांवर छान चमक येते.

हा हेअरमास्क केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा आणि हलक्या हाताने स्काल्पला मसाज करा. त्यानंतर पाऊण तासाने केस धुवून टाका. केस छान चमकदार होतील.

केस कमी वयात पांढरे होऊ नयेत यासाठी आहारात ताज्या हिरव्या भाज्या आणि फळं यांचं प्रमाण वाढवायला हवं.

चिया सीड्, सुकामेवा, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया असा प्रोटीनयुक्त आहार वाढविल्यानेही केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येतो.