शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नाश्त्यासाठी रोज काय करावं प्रश्नच पडतो? ७ हेल्दी- चटपटीत पदार्थ, झटपट होतील सगळ्यांना आवडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 11:22 AM

1 / 9
रोजच्या नाश्त्याला काय करावं हा प्रश्न बऱ्याच घरातल्या महिलांना छळतो. सध्या तर मुलांचे सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे त्यांना काहीतरी चवदार आणि वेगळं पाहिजे असतं. तेच ते पोहे, उपमा खाण्याचा कंटाळा येतो.
2 / 9
असं रोजच काय वेगळं करून द्यावं, असा प्रश्न मग घरातल्या बाईला पडणं अगदी साहजिक आहे. त्यामुळेच हे बघा नाश्त्यासाठी करता येणाऱ्या पदार्थांचे काही खास पर्याय. हे पदार्थ अतिशय हेल्दी आहेत शिवाय चवीला उत्तम. त्यामुळे घरातल्या वयस्कर व्यक्तींपासून ते लहान मुलांपर्यंत सगळेच आवडीने खातील.
3 / 9
सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो सगळ्यांच्या आवडीचा दक्षिण भारतीय नाश्ता. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस तुम्ही इडली, डोसे, उत्तप्पा, अप्पे यापैकी एक काहीतरी करू शकता.
4 / 9
मोड आलेल्या कडधान्यांची मखाना घालून केलेली भेळ हा पदार्थही सगळ्यांना आवडेल. कडधान्यं थोडं वाफवून थंड करून घ्या. नंतर त्यात मखाना, कांदा, टोमॅटो, तुमच्या आवडीच्या कच्च्या भाज्या असं सगळं घालून मस्त चटपटीत भेळ करा.
5 / 9
भरपूर भाज्या घालून केलेले पराठे आणि त्याच्या सोबत तोंडी लावायला कैरीचं ताजं लोणचं, चटणी, बटर असा बेतही सगळ्यांना आवडेल.
6 / 9
तूर, मूग, उडीद अशा मिश्र डाळींचे आलं, लसूण, मिरची घालून केलेले डोसे किंवा अप्पे असा बेतही तुम्ही एखाद्या दिवशी नाश्त्याला करू शकता...
7 / 9
तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या किसून घ्या आणि डाळीच्या पिठात भिजवा. त्यात थोडा रवा टाका आणि या पिठाचे छान धिरडे करा... भाज्याही पोटात जातील आणि चवीतही बदल होईल.
8 / 9
भरपूर भाज्या घालून केलेले प्लेन ओट्स हा देखील नाश्त्यासाठी एक छान, हलका- फुलका पदार्थ आहे.
9 / 9
आठवड्यातून एखाद्या दिवशी भाज्या घालून केलेले सॅण्डविच करा.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते आवडते.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Recipeपाककृती