शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केसांना तेल लावून मालिश केली की केस जास्तच गळतात? ६ टिप्स, तेल लावताना ‘या’ चुका टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2023 16:11 IST

1 / 8
केसांना पोषण मिळण्यासाठी तेल लावून मालिश करावी हे आपल्याला माहिती आहे. पण नेमकी कशी मालिश करावी, हे माहिती नसल्याने आणि खसाखस डोकं चोळतो. त्यामुळे केसांची मुळं दुखावली जातात आणि जास्तच केस गळतात.
2 / 8
केसांना मालिश केल्यानंतर ते जास्तच गळतात असा अनुभव तुम्हालाही येत असेल तर नेमकी मसाज कशी करावी, मसाज करताना कोणत्या चुका टाळाव्या हे एकदा पाहून घ्या. याविषयीची ही माहिती hairmegood या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
3 / 8
केसांच्या मुळाशी व्यवस्थित तेल लागावं यासाठी केसांची विभागणी करा आणि मग एकेका भागात हळूवार तेल लावा.
4 / 8
तळहाताने केसांच्या मुळाशी कधीही घासू नका. बोटांच्या टोकाने गोलाकार दिशेत केसांना मसाज करा.
5 / 8
तेल लावून मसाज केल्यानंतर लगेचच केस विंचरू नका.
6 / 8
थंड किंवा गरम तेलाने केसांना मसाज करू नका. मसाज करण्यासाठी जे तेल वापरात ते कोमट असावे.
7 / 8
डोक्याची त्वचा खूप घाण झाली असेल तर अशा घाण झालेल्या स्काल्पवर तेल लावू नका. कारण त्याचा काहीही उपयोग होत नाही.
8 / 8
केसांना तेल लावल्यानंतर १ ते ३ तास ते केसांवर तसेच राहू द्या आणि त्यानंतर केस धुवा.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजी