बदलत्या ऋतुमुळे मोगऱ्याला बहर नाही? २ रुपयांची वस्तू देते कुंडीतल्या रोपाला ताकद-मोगरा बहरेल फुलांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 15:58 IST2025-05-26T15:55:15+5:302025-05-26T15:58:04+5:30

Best fertilizer for Mogra plant: Mogra plant care in changing weather: उन्हाळ्याचा दिवस म्हणजे मोगऱ्याला बहर येण्याचे दिवस असतात जर अजूनही रोपाला बहर आला नसेल तर या सोप्या ट्रिक्स करुन पाहा.

कधी ऊन तर कधी पाऊस याचा जितका परिणाम आपल्या आरोग्यावर होतो तितकाच आपल्या रोपांवर देखील होतो. अचानक आलेल्या पावसामुळे रोपाचे नुकसान होत आहे. ज्यामुळे रोपांना कळ्या सुद्धा आल्या नाहीत. (Best fertilizer for Mogra plant)

उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात मोगऱ्याचे रोप फुलांनी बहरते परंतु, यंदाच्या हवामान बदलामुळे कुंडीतले रोप सुकत चालले असेल किंवा रोपाला फुलेच येत नसतील तर या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा. (Mogra plant care in changing weather)

उन्हाळ्याचा दिवस म्हणजे मोगऱ्याला बहर येण्याचे दिवस असतात जर अजूनही रोपाला बहर आला नसेल तर या सोप्या ट्रिक्स करुन पाहा.

मोगऱ्याच्या रोपाला पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले तर ते सगळ्यात जास्त फुले देते. त्यासाठी आपल्या कुंडीतल्या मातीत शेणखत किंवा गांडूळखत २५ ते ३० दिवसांनी घालायला हवे.

रोपात खत घालण्यासाठी बटाटा बारीक करुन त्याचा रस गाळून घ्या. त्यात तीन लिटर पाणी घाला. त्यात अर्धा चमचा चुना घाला. ते चांगले मिसळून त्यात बटाट्याचा रस घाला.

आजूबाजूची माती काढून मग त्यामध्ये खत घाला. यामुळे रोपात जास्त माती होणार नाही.

दोन्ही गोष्टी चांगल्या मिसळून मोगऱ्याच्या कुंडीत घाला. त्यानंतर काढलेली माती त्यावर हळूहळू घाला. किंवा कोणतेही इतर खत घालू शकता.

सूर्यप्रकाशासोबत मोगऱ्याला वेळोवेळी पाण्याची गरज देखील असते. पुरेसे पाणी मिळाले नाही तर रोपाला फुले येत नाही.