शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे लेटेस्ट डिझाईन्स- ८ सुंदर पॅटर्न, दिसाल एकदम स्टायलिश, फॅशनेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 17:00 IST

1 / 8
एखादं ब्लाऊज आपल्या अंगावर छान उठून दिसावं असं वाटत असेल तर त्याच्या मागच्या गळ्याप्रमाणेच पुढचा गळाही आकर्षक असणं खूप गरजेचं आहे.
2 / 8
म्हणूनच पुढच्या गळ्याचे हे काही लेटेस्ट प्रकार पाहा. अशा पद्धतीचे ब्लाऊज डिझाईन्स सध्या खूप ट्रेंडिंग आहेत.
3 / 8
कॉलर प्रकारातले ब्लाऊज आवडत असतील तर त्यामध्ये असे कित्येक नवनविन प्रकार मिळत आहेत.
4 / 8
व्हि नेक ब्लाऊजही सध्या चर्चेत आहेत. पण आता डिप नेक ऐवजी त्यात असे शॉर्ट नेक ब्लाऊज जास्त शिवून घेतले जात आहेत.
5 / 8
डिझायनर प्रकारातल्या साडीवर घालायला असं ब्लाऊज छान वाटतं. साडीचा लूक एकदम बदलून जातो.
6 / 8
असे बंद गळ्याचे ब्लाऊजही सध्या हौशीने शिवून घेतले जात आहेत. कॉटन साड्यांवर हे ब्लाऊज खूप छान फॉर्मल लूक देतात. त्यामुळे ऑफिसवेअर साड्यांसाठी कित्येक जणी असे ब्लाऊज शिवण्यास प्राधान्य देत आहेत.
7 / 8
असा गळ्याला बेल्ट असणारा ब्लाऊजही ट्रेंडिंग आहे. डिझायनर साडीसोबतच काठपदर साड्यांवरही तो छान दिसतो.
8 / 8
एखाद्या ब्लाऊजला पानाच्या आकाराचा गळा या पद्धतीने शिवून घ्या. घागरा, लेहेंगा यासाठीही हे ब्लाऊज मस्त वाटतं.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्सsaree drapingसाडी नेसणे