स्किन टोननुसार करा परफेक्ट रंगांच्या कपड्यांची निवड! कोणता रंग तुमच्यावर शोभून दिसेल ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2025 22:05 IST2025-08-02T22:00:00+5:302025-08-02T22:05:01+5:30

Fashion Tips : How to Dress According to Your Skin Tone : how to dress as per skin tone : dressing tips for skin tone : what to wear based on skin tone : how to choose clothes for skin tone : स्किन टोन ओळखून कोणत्या रंगाचे कपडे आपल्यावर अधिक खुलून दिसतील, कसं ओळखायचं बघा...

आपल्या त्वचेचा स्किनटोन ओळखून जर कपड्यांचे परफेक्ट रंग निवडले, तर आपला संपूर्ण लुक अधिक आकर्षक दिसतो. अनेकदा आपण फॅशनच्या नावाखाली अशा रंगांचे कपडे घालतो जे आपल्या स्किन टोनला साजेसे नसतात आणि त्यामुळे आपला लुक फिका वाटतो(How to Dress According to Your Skin Tone).

आपल्या त्वचेच्या स्किनटोनला मॅच होणाऱ्या योग्य रंगसंगतीची (how to choose clothes for skin tone) निवड हे फक्त फॅशन स्टेटमेंटच नाही, तर ती तुमच्या सौंदर्याला अधिक खुलवणारी महत्वाची गोष्ट आहे.

जर आपण आपल्या स्किन टोननुसार योग्य रंगांच्या कपड्यांची निवड केली, तर आपला चेहरा अधिक फ्रेश आणि खुललेला वाटतो. कपड्यांचा योग्य शेड संपूर्ण लुकचा एकदम छान समतोल राखतो, ज्यामुळे तुमचं सौंदर्य अधिकच आकर्षक दिसतं.

स्किन टोन मुख्यतः तीन प्रकारचे असतात. वॉर्म, कूल आणि न्यूट्रल. ते ओळखण्यासाठी आपल्या मनगटावरील नसांकडे लक्षपूर्वक पाहा.. जर नसांचा रंग हिरवट दिसत असेल, तर तुमचा वॉर्म स्किन टोन आहे. जर नसांचा रंग निळा किंवा जांभळा दिसत असेल तर कूल स्किन टोन आहे, आणि जर दोन्ही रंग एकत्र दिसत असतील, म्हणजेच तुमचा स्किन टोन न्यूट्रल आहे.

जर तुमचा स्किन टोन कूल आहे, तर निळा, गुलाबी, जांभळा, सिल्व्हर आणि राखाडी रंगाचे आउटफिट्स तुमच्यावर खूपच छान दिसतील. कूल स्किन टोन असणाऱ्यांनी अतिशय झगमगीत असलेल्या ब्राईट रंगांपासून मात्र थोडं दूर राहणं योग्य ठरेल.

जर तुमचा स्किन टोन वॉर्म असेल तर ऑलिव, मरून, ब्राउन, गोल्डन आणि पीच अशा रंगांचे कपडे तुमच्यावर खास उठून दिसतील. तुमचा लुक खराब दिसू नये असं वाटत असेल, तर खूपच फिकट रंगांचे कपडे घालणे टाळा. हे रंग तुमचा लुक बिघडवू शकतील.

जर तुमचा स्किन टोन न्यूट्रल असेल तर तुमच्यावर बहुतांश रंग सहज खुलून दिसतील. तुम्ही ज्वेल टोन कलर्स जसं की एमराल्ड ग्रीन, डीप ब्लू, बरगंडी, तसेच मिड-टोन रंग जसं की टोमॅटो रेड, पर्सिमन ऑरेंज अशा रंगाचे कपडे घालू शकता. ना खूप फिकट ना खूप गडद – मध्यम टोनचे रंग तुमच्यावर विशेष चांगले शोभून दिसतील.