शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक महिलेची तब्येत आणि मूड ठणठणीत ठेवणारे ५ पदार्थ, नातीपासून आजीपर्यंत प्रत्येकीनं रोज खायला हवेत आनंदाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 20:07 IST

1 / 6
काही पदार्थ असे आहेत जे प्रत्येक वयोगटातल्या महिलांनी अगदी नियमितपणे खायलाच हवेत. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..
2 / 6
पहिला पदार्थ आहे बीटरुट. बीटरुटमधून लोहाची कमतरता तर भरून निघतेच, पण त्यात फायबर भरपूर असल्याने पोट साफ होण्यासही मदत होते. रक्ताभिसरण चांगले होते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
3 / 6
बदाम नियमितपणे खाणंही खूप आवश्यक आहे. त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम मिळते. शिवाय पचनक्रिया चांगली होण्यासाठीही बदाम फायदेशीर ठरतात.
4 / 6
प्लेन ओट्सचे वेगवेगळे पदार्थही तुमच्या नाश्त्यामध्ये असायला हवे. पण बाहेर विकत मिळणारे फ्लेवर्ड, मसालेदार ओट्स मात्र टाळावे. ओट्समधून प्रोटीन्स, हेल्दी कार्ब्स, ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात. शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी ओट्स उपयुक्त ठरतात.
5 / 6
कॅल्शियमची कमतरता बऱ्याच महिलांच्या शरीरात दिसून येते. शिवाय तिशीनंतर पाठदुखी, कंबरदुखीही सुरू होतेच. हे टाळायचं असेल तर रोज दूध प्यायलाच हवं. दुधामधून कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन बी, प्रोटीन्स, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी देखील पुरेशा प्रमाणात मिळते.
6 / 6
ब्रोकोली हे देखील महिलांसाठी एक सुपरफूड आहे. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ब्रोकोली उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर यांचा धोका कमी करण्यासाठीही ब्रोकोलीचा उपयोग होतो. ब्रोकोलीमधून कॅल्शियमही चांगल्या प्रमाणात मिळते. ही माहिती NFHS study (2015-16) या अहवालात प्रकाशित करण्यात आली आहे.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सWomenमहिलाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न