शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात 'या' पद्धतीने जेवा; शुगर वाढणार नाही- वजनही राहील नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 13:13 IST

1 / 8
वजन आणि शुगर या दोन्ही गोष्टी नियंत्रित ठेवायच्या असतील तर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जेवणाची सुरुवात कशी करावी, कोणते पदार्थ खावे तसेच कोणते पदार्थ टाळावे, याविषयीची माहिती डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी साेशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.
2 / 8
यामध्ये ते सांगतात की जे लोक प्री- डायबिटिक स्टेजमध्ये आहेत, त्यांनीही त्यांची शुगर वाढू नये यासाठी याच काही नियमांचे पालन करावे.
3 / 8
डॉ. दीक्षित यांच्यामते ज्यांना शुगरचा त्रास आहे, अशा लोकांनी मनुका, बेदाणे अशा गोड चवीचा सुकामेवा खाणं टाळलं पाहिजे. बदाम, अक्रोड, शेंगदाणे असे ते खाऊ शकतात.
4 / 8
कोणत्याही व्यक्तींनी जेवणाची सुरुवात सलाड खाऊन करणं गरजेचं आहे. पण जे लोक डायबिटीक आणि प्री- डायबिटीक अवस्थेत आहेत त्यांनी गाजर आणि बीट खाणे टाळायला हवे. काकडी, टोमॅटो किंवा इतर सलाड प्रकार ते खाऊ शकतात.
5 / 8
जेवणाची सुरुवात सलाड खाऊन झाल्यानंतर मोड आलेली कडधान्ये खावी. यामध्ये तुमची पचनक्षमता जशी आहे त्यानुसार कच्चे किंवा वाफवलेले, शिजवलेले कडधान्य साधारण १ वाटी एवढ्या प्रमाणात खावे. यानंतर मग जेवणाला सुरुवात करावी.
6 / 8
डॉ. दीक्षितांनी सांगितलेला आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणाची सुरुवात कधीही पोळी किंवा चपाती, भाकरी खाऊन करू नये.
7 / 8
ज्या लोकांची HBA1C पातळी खूप वाढलेली असते त्यांनी २ ते ३ महिने फळं खाणंही टाळायला हवं. ती लेव्हल एकदा नॉर्मलला आली की मग डॉक्टरांच्या सल्ल्याने ते काही फळ खाण्यास सुरुवात करू शकतात.
8 / 8
याशिवाय अधूनमधून काही खाण्याची सवय नको. कारण त्यामुळे शरीरातील इन्सुलिन वाढू शकते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी असं काही घेऊ शकता. याशिवाय रिफाईंड शुगर खाणे टाळावे आणि दिवसातून ४५ मिनिटे व्यायाम करावा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहfoodअन्नfruitsफळे