शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बघा फळं- भाज्या चिरण्याची योग्य पद्धत! पोेषण आणि चव घालवून टाकणाऱ्या 'या' ५ चुका टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2024 18:12 IST

1 / 6
फळं किंवा भाज्या चिरणं हे अगदी रोजचंच काम. पण तरीही ते करताना आपल्याकडून नकळत काही चुका होतात. ज्यामुळे भाज्यांमधला पौष्टिकपणा कमी होऊ शकतो. या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूया....
2 / 6
यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फळं किंवा भाज्या नेहमी धारदार सुरीने चिराव्या. जर तुमच्या सुरीला धार नसेल तर बऱ्याचदा चिरताना भाज्यांमधलं पाणी किंवा रस जास्त प्रमाणात बाहेर गळून जातं. त्यामुळे मग त्यातली पोषणमुल्ये त्या पाण्यासोबत निघून जातात.
3 / 6
भाज्या किंवा फळं नेहमी चिरण्याच्या आधी धुवा. त्या चिरल्यानंतर धुतल्या तर त्यातील वॉटर सॉल्यूबल व्हिटॅमिन्स निघून जातात.
4 / 6
भाज्या जर तुम्ही खूपच बारीक चिरणार असाल तर त्यातली पोषणमुल्ये कमी होत जातात असं म्हणतात. शिवाय अशा खूप जास्त बारीक चिरलेल्या भाज्या लवकर खराबही होतात. त्यामुळे भाज्या खूप बारीक चिरू नये आणि खूप जाड- जाड देखील ठेवू नये.
5 / 6
कोणत्याही फळाचे किंवा भाजीचे साल काढताना तुम्ही ते अगदी पातळ काढत आहात, याकडे लक्ष द्या. खूप जाड साल काढून त्या छिलल्या तर सालांच्या अगदी खाली असणारे अनेक व्हिटॅमिन्स, खनिजे निघून जातात.
6 / 6
काकडी, कोवळा भोपळा यांची सालं खाण्यायोग्य असतात. अशांची सालं काढून तुम्ही त्यातली पोषणमुल्ये वाया घालवत तर नाही ना, याकडे लक्ष द्या...
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्सvegetableभाज्याfruitsफळे