1 / 11अभ्यासाला बसलं की जांभाई आलीच म्हणून समजा. अभ्यास म्हटलं की, प्रचंड आळस येतो. 2 / 11पण काही साध्या सोप्या उपायांचा वापर करून हा आळस घालवता येतो. असे उपाय जाणून घ्या. 3 / 11अति अभ्यास करण्याचे ध्येय ठेवूच नका. लहान - लहान धडे वाचा. एखादाच प्रश्न करीन असं ठरवून अभ्यासाला बसा. डोक्याला ताण येईल असे काही ठरवू नका.4 / 11एक वेळापत्रक तयार करून घ्या. त्यानुसारच सगळी कामं करा. एकदा का शरीराला त्याची सवय लागली की, ते आपोआप पाळले जाते. 5 / 11मोबाइल फोनचे नोटीफीकेश बंद करून ठेवा. मन विचलीत करणारं काहीच जवळपास ठेवू नका. 6 / 11एकदाच मोठं काही करायला जाऊ नका. मोठा धडा असेल तर त्याचे भाग करून घ्या. त्यानुसार अभ्यास करा.7 / 11आवडीच्या विषयाने सुरवात करा. मग नावडते विषय करायला घ्या. एकदा का सवय झाली की मग कंटाळा येणार नाही.8 / 11एखादी संकल्पना समजून घेताना, आजूबाजूची उदाहरणे वापरा. त्यामुळे ते लक्षात ठेवणं सोपं जातं. मजेशीरही वाटतं.9 / 11एका दिवसात किती अभ्यास करणार ते ठरवून घ्या. आवडीच्या कृतीही करा मन शांत राहील.10 / 11सतत पुस्तक उघडून बसू नका. आरामही करा. ब्रेक घ्या. फ्रेश व्हा मग पुन्हा अभ्यासाला लागा.11 / 11बाहेर जाऊन एक फेरफटका मारून या. डोकं आणि मन दोन्ही फ्रेश होते.