शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Christmas special gifts: मुलांना द्या ५ हटके गिफ्ट, मुलं खुश आणि आयडिया भन्नाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 9:50 AM

1 / 7
ख्रिसमस म्हणजेच नाताळचा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाताळच्या आदल्या रात्री म्हणजेच २४ डिसेंबरला सांताक्लॉज येऊन आपल्याला गिफ्ट देऊन जातो असे आपण लहान मुलांना सांगतो. आता हे जरी खरे असले तरी सांता म्हणून पालकच मुलांच्या उशाशी गिफ्ट ठेवतात (Christmas Gift Ideas For Kids).
2 / 7
आता ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आपल्या लहानग्यांना काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज आपण मुलांना ख्रिसमससाठी गिफ्ट म्हणून देता येतील असे काही छान पर्याय पाहणार आहोत.
3 / 7
लहान मुलांना आर्टशी निगडीत काही ना काही वस्तू तयार करायला आवडतात. विशेष म्हणजे यामध्ये मुलांचा वेळही अतिशय छान जातो. मुलांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी बाजारात अशाप्रकारचे बरेच पर्याय उपलब्ध असतात.
4 / 7
आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना आवडतील अशी गोष्टीची किंवा कॉमिक्सची पुस्तकं भेट देऊ शकतो. यामुळे वाचनाची सवय तर लागतेच पण एका जागी बसून एकाग्रता होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
5 / 7
स्टेशनरी ही मुलांसाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट असते. मूल शाळेत जाणारे असेल तर त्याला सतत पेन, पेन्सिल, पाऊच, रंगकामाचे साहित्य अशा गोष्टी लागतात. मुलांना आवडतील असे वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे स्टेशनरीचे सामान आणले तर ते पाहून मुलं नक्कीच खूश होऊ शकतात.
6 / 7
पझल गेम्स हा अनेक मुलांसाठी अतिशय आवडीचा विषय असतो. पझल गेम्स खेळल्याने मुलांचा वेळ तर चांगला जातोच पण त्यांच्या मेंदूलाही चांगली चालना मिलण्यास या गेम्सची मदत होते.
7 / 7
मुलांना साधारणपणे चॉकलेट आणि कुकीज अशा गोष्टी आवडतात. एरवी आपण मुलांना या गोष्टी देत नाही. पण ख्रिसमसच्या निमित्ताने घरगुती चॉकलेट-कुकीज असे प्रकार आपण मुलांना गिफ्ट म्हणून देऊ शकतो. यामुळे मुलं खूश तर होतील आणि त्यांना आवडीचा खाऊ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद वेगळाच असेल.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलChristmasनाताळGift Ideasगिफ्ट आयडिया