मेहेंदी लावायची म्हणून लेक हट्ट करते? पाहा लहान मुलींच्या नाजूक हातांसाठी मेहेंदीच्या ६ सुंदर डिझाइन्स!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 14:47 IST2025-09-10T14:41:42+5:302025-09-10T14:47:30+5:30
Check out these 6 beautiful mehendi designs for kids, must try : लहान मुलींसाठी मेहेंदी डिझाइन.

मेहेंदी हाताला लावल्यावर हाताचे सौंदर्य काही औरच दिसते. अनेक प्रकारचे डिझाइन काढता येतात. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे डिझाइन काढले जाते. महिलांच्या हातावर मेहेंदी जशी खुलून दिसते तशीच चिमुकल्या लहान हातांवरही सुंदर दिसते.
लहान मुलं जरी मेहेंदी लगेच पुसून टाकत असले तरी त्यांना मेहेंदीची आवड असते. मात्र त्यांच्या हातावर मोठाली डिझाइन्स काढता येत नाहीत. त्यांच्या हातावर सुंदर दिसतील अशी काही खास डिझाइन्स पाहा.
हाताच्या मागच्या बाजूला काढण्यासाठी लहानसे फुलाचे चित्र आणि त्यासोबत छान दिसतील अशा इतर काही डिझाइन मस्त दिसतात.
अगदी बेबी हॅण्ड्स साठी हार्ट शेप आणि फुलं तसेच लहानशी बोटं रंगवून सुंदर दिसतात. काढायला अगदी काही मिनिटे लागतात त्यामुळे बाळ चिडचिडही करणार नाही.
छानसे साधे फुलही लहान मुलांच्या हातावर सुंदरच दिसते. काढायलाही सोपे आहे कोणीही काढू शकेल.
लहान मुलांच्या आवडीचा टेडी बेअर त्यांच्या हातावर काढा आणि त्यावर आवडता टेक्स लिहा. मुलांना हे डिझाइन नक्की आवडेल.
लहान मुलांच्या हातावर फुलपाखरू फार सुंदर दिसते. त्यासोबत चांदण्यांचे डिझाइन एकदम मस्त वाटेल.
स्मायली किंवा साधे डिझाइन काढून बोटांना बारीक डिझाइन केले तरी मुलांना ते नक्की आवडले.