शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हर टॅटू कुछ कहता है... प्रियांका चोप्रा ते सायली संजीव; वाचा सेलिब्रिटींच्या टॅटूची 'इमोशनल' गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 3:40 PM

1 / 8
१. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने केलेला टॅटू सध्या चांगलाच गाजतो आहे. तिने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली असून यामध्ये तिच्या या नव्या टॅटूचा फोटो टाकला आहे. ''This is for you बाबा..'' अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. गळ्याच्या थोडं खाली डाव्या बाजूला तिने पक्षी उडत असलेला एक टॅटू केला आहे. यापुर्वी देखील सायलीने तिच्या हातावर एक टॅटू केला आहे..
2 / 8
२. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने तिच्या हातावर केलेला टॅटूही चांगलाच गाजला होता. तिच्या वडीलांचं निधन झालं तेव्हा त्यांच्यासाठी तिने हा टॅटू काढून घेतला होता. ''डॅडीज लिल गर्ल'' असं तिने इंग्रजीमध्ये लिहिलं आहे.. त्यावेळी तिने शेअर केलेली तिची भावनिक पोस्ट आणि तिचा टॅटूही सोशल मिडियावर चांगलाच गाजला होता.
3 / 8
३. बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) अनेकदा काही अतरंगी गोष्टी करत असते. कधी तिच्या एखाद्या स्टेटमेंटची चर्चा होते, तर कधी तिच्या कपड्यांची. अशीच जबरदस्त चर्चा आलियाच्या टॅटूचीही झाली होती. तिच्या तिच्या मानेवर ''पटाका'' अशी अक्षरे असणारा टॅटू करून घेतला होता. यावरून ती बरीच ट्रोलही झाली होती.
4 / 8
४. मराठी अभिनेत्री हृता हिने (Hruta Durgule) देखील तिच्या हातावर 'hdp' असा टॅटू करून घेतला आहे. आता या 'hdp' चा अर्थ प्रत्येकजण आपापल्या मनाने लावत आहे. हृता दुर्गुले हा hd चा लाँगफॉर्म असावा आणि त्यातील p हे तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या म्हणजेच प्रतिकच्या नावाचे इनिशियल आहे, असे सांगितले जाते.
5 / 8
५. टॅटू करण्यात दीपिका पदूकोनही (Dipika Padukon) मागे नाही.. तिने तिच्या मानेवर एक मस्त टॅटू करून घेतला आहे... पाने, वेली अशा प्रकारची नक्षी तिच्या मानेवर असून अतिशय सेक्सी लूक देणारा हा टॅटू आहे. कॉलर नसलेल्या कोणत्याही ड्रेसवर तिचा हा टॅटू चटकन दिसेल अशा ठिकाणी करण्यात आला आहे.
6 / 8
६. तापसी पन्नूने (Tapsi Pannu) तिच्या गळ्याच्या खाली डाव्या बाजूला करून घेतलेला टॅटूही अतिशय खास आहे.. या टॅटूमध्ये तिने चार उडणारे पक्षी काढून घेतले आहेत. सिंपल आणि क्यूट अशा प्रकारचा हा टॅटू अगदी कुणासाठीही परफेक्ट ठरू शकतो, असाच आहे.
7 / 8
७. शिल्पा शेट्टीनेही (Shilpa Shetty) तिच्या डाव्या हातावर टॅटू करून घेतला आहे. इतर कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा शिल्पाचा टॅटू वेगळा आहे. कारण तिने तिच्या हातावर स्वस्तिक काढून घेतलं आहे. साधं, छोटंसं स्वस्तिक आणि त्याच्या आत चार ठिपके असं एवढंसंच असणारं हे टॅटू तिच्या हातावर हटके दिसतं.
8 / 8
८. अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिने तिच्या हातावर ‘Aut Viam Inveniam Aut Faciam....’ असं लिहिलं आहे.. याचा अर्थ असा होतो की एकतर मी माझा मार्ग शोधून काढेल किंवा मग स्वत:साठी नवा मार्ग तयार करेल.. सुशचा हा टॅटू तिच्या व्यक्तिमत्त्वाला अगदीच शोभणारा आहे..
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सCelebrityसेलिब्रिटीfashionफॅशनSayali Sanjeevसायली संजीवHruta Durguleऋता दूर्गुळेTaapsee Pannuतापसी पन्नूPriyanka Chopraप्रियंका चोप्राShilpa Shettyशिल्पा शेट्टीSushmita Senसुश्मिता सेन