छातीचा आकार बेढब दिसतो? ‘या’ नेक पॅटर्नचे ब्लाऊज घाला-दिसाल स्लिम आणि आकर्षक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 11:44 IST2025-09-11T19:37:32+5:302025-09-12T11:44:42+5:30

Blouse Neckline For Heavy Bust : best blouse neckline for heavy bust : blouse designs to hide heavy bust : blouse neck patterns for heavy chest : blouse designs to balance heavy bust look : छातीकडील भाग रुंद व मोठा असल्यास, ब्लाऊज नेक पॅटर्न शोभेल असा निवडल्यास ही समस्या सहज लपवता येते...

अनेक महिलांना ब्लाऊज निवडताना हा प्रश्न पडतो की, जर स्तनांचा भाग मोठा (Blouse Neckline For Heavy Bust) असेल तर तो व्यवस्थित दिसावा यासाठी कोणत्या पॅटर्नचे ब्लाऊज वापरावेत. चुकीच्या पॅटर्नमुळे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आणि लुक बिघडू शकतो. पण योग्य डिझाइन आणि परफेक्ट गळ्याचा ब्लाऊज निवडल्यास हा भाग अगदी व्यवस्थित दिसतो, ज्यामुळे आकर्षक आणि सुंदर लुक दिसतो.

छातीकडील भाग थोडा रुंद व मोठा असल्यास, ब्लाऊज पॅटर्न आणि गळ्याची रचना (blouse designs to hide heavy bust) शोभेल अशी निवडल्यास ही समस्या सहज लपवता येते आणि लूक अधिकच आकर्षक व सुंदर दिसतो.

आपण असे काही खास ब्लाऊज पॅटर्न्स पाहूयात जे, छातीकडील रुंद भाग (blouse neck patterns for heavy chest) व स्तनांचा मोठा आकार लपवण्यास मदत करु शकतात.

स्कूप नेक हा ब्लाऊजचा एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे, जो गळ्याच्या बाजूने खोल आणि गोलाकार असतो. ज्या महिलांचा छातीचा भाग किंवा स्तनांचा आकार मोठा आहे, त्यांच्यासाठी हा पॅटर्न खूपच फायदेशीर आहे. स्कूप नेक ब्लाऊजमुळे लक्ष स्तनांच्या भागावर न जाता गळ्याच्या बाजूला जाते. त्यामुळे छातीचा भाग मोठा दिसत नाही.

लीफ नेक याला 'पान गळा' असेही म्हणतात, कारण त्याचा आकार पानासारखा असतो. हा गळा समोरून व्ही-आकारामध्ये किंवा गोल असून बाजूने थोडा रुंद असतो, ज्यामुळे असा गळ्याचा पॅटर्न छातीचा भाग मोठा असल्यास लपवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो. हा ब्लाऊज शिवताना तुम्हाला अधिक आकर्षक दिसायचे असेल, तर तुम्ही स्लीव्हलेस किंवा थ्री-फोर्थ स्लीव्हचा पर्याय निवडू शकता.

क्वीन ॲन नेकलाइन हा ब्लाऊजचा एक अत्यंत सुंदर आणि रॉयल पॅटर्न आहे. या नेकपटर्नचे खास वैशिष्ट्य म्हणजे, यात मागच्या बाजूला व्ही-आकार किंवा चौकोनी गळा असतो, तर समोरच्या बाजूला उंचावलेला आणि गोलाकार किंवा पानासारखा आकार असतो. या गळ्याच्या डिझाइनमुळे लक्ष गळ्याच्या आणि खांद्यांच्या भागाकडे आकर्षित होते, ज्यामुळे छातीचा मोठा भाग लपवता येतो.

कॉलर नेकलाइन हा एक मॉडर्न ब्लाऊजचा प्रकार आहे. कॉलरमुळे ब्लाऊजला शर्टसारखा लुक येतो, ज्यामुळे एक वेगळाच क्लासिक आणि प्रोफेशनल लुक मिळतो. स्तनांचा भाग जर मोठा असेल तर ब्लाऊजच्या गळ्याचा हा पॅटर्न एक उत्कृष्ट पर्याय ठरतो. ऑफिससाठी किंवा कोणत्याही फॉर्मल कार्यक्रमासाठी हा पॅटर्न खूप चांगला दिसतो. तुम्ही या ब्लाऊजसोबत प्लेन साडी नेसल्यास तुमचा लुक अधिक उठून दिसेल.

पेंटागॉन नेकलाइन हा ब्लाऊजचा एक हटके आणि स्टायलिश प्रकार आहे, जो त्याच्या विशिष्ट पंचकोनी (pentagon) आकारामुळे ओळखला जातो. याला मराठीत 'पंचकोनी गळा' असेही म्हणतात. स्तनांचा मोठा भाग लहान दिसण्यासाठी अशा पॅटर्नचे ब्लाऊज शोभून दिसतात. हा नेक पॅटर्न विशेषतः रेशीम किंवा कॉटनच्या साडीसोबत अधिक चांगला दिसतो.

स्कॅल्प नेकलाइन हा ब्लाऊजचा एक अत्यंत आकर्षक आणि नाजूक प्रकार आहे. या गळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या नेक पॅटर्नच्या काठला लहान अर्ध-वर्तुळाकार (अर्ध-गोलाकार) डिझाइन असते, ज्यामुळे त्याला शिंपल्यासारखा (scallop) आकार मिळतो. स्कॅल्प नेकलाइनमुळे ब्लाऊजला एक सुंदर आणि नाजूक फिनिशिंग मिळते, ज्यामुळे तो खूप आकर्षक दिसतो. या गळ्याच्या गोलाकार आणि नाजूक डिझाइनमुळे स्तनांच्या मोठ्या आकाराकडे फारसे लक्ष जात नाही, परिणामी हा भाग लहान दिसण्यास मदत होते.