साडी नेसून ग्लॅमरस नाही तर पोक्त-प्राैढ दिसता? ब्लाऊजचा पुढचा गळा शिवताना 'या' चुका टाळा- दिसाल स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 18:27 IST2025-04-05T13:21:14+5:302025-04-05T18:27:50+5:30

साडी नेसल्यावर तुमचा लूक अधिक छान आणि आकर्षक दिसावा यासाठी ब्लाऊजची फिटिंग आणि विशेषत: ब्लाऊजचा पुढचा गळा व्यवस्थित जमून आला पाहिजे.

अशा पद्धतीने जर समोरच्या गळा कमी रुंदीचा असणारे ब्लाऊज शिवले तर पदराच्या निऱ्या अजिबात व्यवस्थित बसत नाहीत आणि तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त प्रौढ दिसू लागता.

समोरच्या बाजूने चौकोनी गळा असणारे ब्लाऊजही खूप छान लुक देतो

त्यामुळे ब्लाऊजचा समोरचा गळा अशा पद्धतीने थोडा पसरट घ्या.

बोट नेक ब्लाउज घेणार असाल तर त्याचाही गळा थोडा अशा पद्धतीने पसरट आणि लांब घ्या. यामुळे निऱ्या छान बसतात.

पंचकोनी गळ्याचे ब्लाऊज सुद्धा खूप छान दिसते. अशा गळ्याच्या ब्लाऊजवर फ्लोटिंग पदर किंवा निऱ्या घातलेला पदर असे दोन्हीही छान वाटते.

गोलाकार गळा घ्यायचा असेल तर तो अशा पद्धतीने थोडासा पसरट घ्या.