1 / 9आपल्या दिवसाची सुरुवात ही योग्य आहाराने असायला हवी असं कायमच म्हटलं जातं. पण आपण ते किती फॉलो करतो हे आपल्यालाच माहित. सकाळी उठल्यानंतर चहा-कॉफी प्यायल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते. पण यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. (weight loss morning drinks)2 / 9शरीरातील ऊर्जा कमी होते, गॅस आणि आम्लता वाढते, आपल्याला अचानक सुस्ती येते आणि कमकुवत वाटू लागतं. त्यासाठी रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे टाळा. याऐवजी आपण काही हेल्दी पेयांने आपल्या दिवसाची सुरुवात करु शकतो. पोषणतज्ज्ञ तानिया मेहरा म्हणतात रिकाम्या पोटी शरीराला आतून पोषण देणारे पेय प्यायला हवे. त्यातील हे काही ७ पर्याय (morning drinks for hair health)3 / 9अंजीरमध्ये भरपूर फायबर असते, म्हणून त्याचे पाणी प्यायल्याने पचन होण्यास मदत होते. पोट हलके राहते. अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी १२ सारखे पोषण घटक असतात. जे अँटीऑक्सिडंट्सचे चांगले स्त्रोत आहेत. यामुळे तणाव देखील कमी होतो. रात्रभर ग्लासभर पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या. 4 / 9कलोंजीचे पाणी हे रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर ठरु शकते. जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल, रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल किंवा केस मजबूत करायचे असतील तर हे पाणी प्यावे. 5 / 9काळ्या मनुक्याचे पाणी हार्मोन्स संतुलित करण्यास उपयुक्त मानले जाते. यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. त्यात लोह आणि कॅल्शियम देखील भरपूर असते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रात्रभर ४ ते ५ काळे मनुके पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या. 6 / 9केशरचे पाणी हे आपला मूड सुधारण्याचे काम करते. हे नैसर्गिक अँटीडिप्रेसंट देखील मानले जाते. केशर आपल्या मेंदूसाठी फायदेशीर आहे. त्यासाठी केशरचे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. 7 / 9धण्याचे पाणी पाणी पोटफुगी, गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम देते. कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. आपल्याला पचनाच्या समस्या येत असतील तर अर्धा चमचा धणे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. 8 / 9रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. मासिक पाळीतील क्रॅम्प कमी होण्यास, केस गळती कमी करण्यास, अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास आणि त्वचेला चमकदार बनण्यास मदत होते.9 / 9चिया सीड्स आणि लिंबू पाणी आपण पिऊ शकतो. चिया सीड्समध्ये ओमेगा -3, फायबर आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत. ज्यामुळे वजन कमी करता येते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते.