शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2024 3:46 PM

1 / 6
वाढतं वजन किंवा सुटलेलं पोट यामुळे अनेकजण सध्या त्रस्त आहेत. म्हणूनच तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी दुपारचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर २ गोष्टी करायला अजिबात विसरू नका...
2 / 6
ही दोन कामं नेमकी कोणती आणि ती कशा पद्धतीने करावी, याविषयीचा व्हिडिओ आयुर्वेदिक डॉक्टरांनी chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
3 / 6
यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जेवल्यानंतर तुम्ही १० ते १२ मिनिटांसाठी एका जागी शांत बसा. यामुळे तुमचं अन्न पचन क्रियेपुर्वी पोटात स्थिर होण्यासाठी मदत होईल.
4 / 6
यानंतर मग तुम्ही शतपावली करा. शतपावली करणे म्हणजे १०० पावलं चालणे. शतपावली कशी करावी, जोरात चालावं की हळू चालावं, असे प्रश्न अनेकांच्या मनात येतात. त्यांचीही उत्तरं डॉक्टरांनी व्हिडिओमध्ये दिली आहेत.
5 / 6
डॉक्टर सांगतात की शतपावली करताना अजिबात घाई- गडबड करू नका. उलट अतिशय आरामात, सावकाशपणे, रमतगमत, गप्पा मारत शतपावली करा.
6 / 6
अशा पद्धतीने शतपावली केल्यास अन्नाचे व्यवस्थित पचन होते. त्यामुळे साहजिकच अंगावर चरबी साचण्याचे प्रमाण कमी होऊन वजन आटोक्यात राहते आणि वाढत्या पोटावरही नियंत्रण येते.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स