अथिया शेट्टी आणि राहुलची मॅजिकल लव्हस्टोरी! पडत्या काळात एकमेकांना दिली साथ, आता नव्या वळणावर कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 14:23 IST2025-03-13T13:34:01+5:302025-03-13T14:23:33+5:30
Athiya Shetty and Rahul's magical love story! They supported each other during the difficult times : कुणीतरी येणार ग!! भारताचा चॅम्पिअन केएल राहुल होणार आता बाबा. पाहा अथिया व राहुलची लव्हस्टोरी!!

बऱ्याच डाऊनफॉल्समधून गेल्यानंतर आता केएल राहुलला पुन्हा फॉर्ममध्ये बघून सर्वच भारतीय फार खुष आहेत. भारताने खेळलेल्या अनेक अटीतटीच्या सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
काही दिवसांपूर्वी अथिया शेट्टीने तिच्या बेबी बंपचे फोटो पोस्ट केले. केएल जेवढा शांत आहे, तेवढाच प्रेमळही आहे. असे ती मुलाखतींमध्ये सांगतच असते. त्या दोघांचे काही रोमॅन्टीक फोटोही तिने पोस्ट केले आहेत.
२०१९ मध्ये केएल आणि अथिया त्यांच्या एका कॉमन फ्रेंडमुळे संपर्कात आले. केएल तेव्हाही भारतासाठी खेळतच होता. अथिया सुनील शेट्टींची मुलगी आहे हे तो जाणून होता.
पहिल्याच भेटीत त्यांना एकमेकांचा सहवास फार आवडला. लगेचच कोणत्या निष्कर्षावर न पोहचता दोघांनीही छान मैत्रीचे नाते तयार केले. (source:curixtv.official)
त्यानंतर ते दोघे सतत काहीही ना काही कारणाने भेटत राहीले. त्यांच्या गप्पा छान रंगायच्या. दोघांनाही एकमेकांचा सहवास फार आवडत होता.
अथियाचं बॉलिवूड करीयर फार काही चांगलं चालत नव्हतं. केएललाही त्याच्या गेमसाठी लोकांचे टोपणे ऐकावे लागत होते. अशावेळी त्या दोघांनी एकमेकांना आधार दिला.
हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अथिया केएलच्या सगळ्या सामन्यांना हजेरी लावायला लागली. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या बरोबर सगळीकडे असायची.
सुनील शेट्टीलाही केएल राहूल एक माणूस म्हणून आधीपासूनच आवडायचा. सुनील शेट्टीने त्याच्या मुलाखतींमध्ये त्याची मुलगी नशीबवान असल्याचे सांगितले होते.
अथिया व केएल राहुल यांचे नाते दोन वर्षांसाठी त्यांनी लपवून ठेवले. २०२० साली केएलच्या वाढदिवसाला अथियाने इंस्टाग्रामला स्टोरी टाकून 'माय परसन' असं टॅग केल्यावर त्यांचे नाते जगजाहीर झाले..
तीन वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्यांनी २३ जानेवारी २०२३ मध्ये लग्न केले. आता ते लवकरच आई-बाबा होणार आहेत.