शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

खासदार कंगना रणौतचं पाहा पॉवर ड्रेसिंग! गॉगल, घड्याळ आणि साडी इतकी सुंदर की.. पाहा फोटो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 09:40 IST

1 / 5
अभिनेत्री तथा खासदार कंगना रणौतचा एक साडी लूक सध्या सोशल मीडियावर अतिशय व्हायरल होत आहे.. 'जैसा देश वैसा वेश..' या उक्तीनुसार कंगना नुकतीच संसदेत जाताना दिसून आली. यावेळी तिचा लूक तिच्या तिथल्या पदाला शोभून दिसणारा होता.
2 / 5
मोतिया रंगाची सिल्क- कॉटन ब्लेंड साडी तिने नेसली होती. या साडीवरचं निळसर रंगाचं, बंद गळ्याचं ब्लाऊज तिला एक वेगळाच रुबाब देणारं ठरलं..
3 / 5
ही साडी आसामी धाटणीची असावी असं वाटतं.. साडीचे काठ मोठे आहेत आणि त्यावर निळ्या, लाल, पिवळ्या रंगाची सुंदर नक्षी आहे..
4 / 5
यासोबतच कंगनाने हातात घेतलेली पर्स, तिचं घड्याळ, तिचा गॉगल या सगळ्याच गोष्टी एवढ्या आकर्षक आणि तिला शोभून दिसणाऱ्या आहेत की पाहता पाहता कंगनाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे...
5 / 5
कंगनाने खासदार पदाचा मान आणि पत अगदी उत्तम पद्धतीने सांभाळली आहे, असा तिचा हा लूक पाहून तिचे चाहते म्हणत आहेत आणि तिचं भरभरून कौतुक करत आहेत.
टॅग्स :fashionफॅशनKangana Ranautकंगना राणौतParliamentसंसदsaree drapingसाडी नेसणे