शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता 'हे' ७ आरोग्यदायी स्नॅक्स; वजन वाढण्याची नाही भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:35 IST

1 / 9
संध्याकाळी भूक लागते आणि हिवाळ्याच्या दिवसात चहा पिण्याचा आनंद काही औरच असतो. पण फक्त चहा पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही आणि जर चहासोबत तळलेले किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ले तर वजन वाढू शकतं.
2 / 9
अशा वेळी काही आरोग्यदायी स्नॅक्स हे आहाराचा भाग बनवता येतात. आरोग्य चांगले ठेवणारे आणि वजन वाढण्यापासून रोखणारे आरोग्यदायी स्नॅक्स कोणते आहेत ते जाणून घेऊया...
3 / 9
मखाना चहासोबत खाऊ शकतो. मखाना खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. काळी मिरी आणि मीठ घालूनही खाऊ शकता.
4 / 9
निरोगी स्नॅक्समध्ये भाजलेले शेंगदाणे देखील समाविष्ट आहेत. शेंगदाणे भाजून खाऊ शकतात. पण जास्त शेंगदाणे खाऊ नये हे लक्षात ठेवा.
5 / 9
पॉपकॉर्न चहासोबतही खाऊ शकता. निरोगी स्नॅक्ससाठी पॉपकॉर्न हा एक चांगला पर्याय आहे.
6 / 9
बीटरूट चिप्स देखील आरोग्यासाठी चांगले असतात. बीट सुकवून किंवा भाजून चिप्स तयार केले जातात.
7 / 9
स्प्राउट्स चाटचा देखील नाश्त्यात समावेश करा आणि तुम्ही ते संध्याकाळच्या चहासोबत देखील खाऊ शकता. स्प्राउट्स चाटमध्ये कडधान्य, भाज्या आणि लिंबाचा रस घालून त्याची चव वाढवा.
8 / 9
रताळे उकडवून कापा आणि नंतर तव्यावर हलके तळता येतात. अशाप्रकारे तो चहासोबत खाण्यासाठी एक चांगला पर्याय बनतो. या रताळ्यावर थोडासा मसाला टाका.
9 / 9
पोहे हे चविष्ट लागतात आणि आरोग्यासाठीही खूप चांगले असतात. अनेकांना पोहे फार आवडतात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स