ब्रेसलेटचे ७ सुंदर डिझाईन्स, तुमचे हात दिसतील सुंदर आणि रोज वापरण्यासाठी एकदम मस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 14:49 IST2025-09-19T14:40:59+5:302025-09-19T14:49:08+5:30
7 beautiful bracelet designs, your hands will look beautiful and are perfect for everyday use : रोजच्या वापरासाठी मस्त असे ब्रेसलेट्स डिझाइन नक्की पाहा.

हातात बांगड्या घातल्यावर हाताची शोभा वाढते. आजकाल फक्त बांगड्याच नाही तर इतरही अनेक प्रकार असतात. त्यापैकी एक प्रकार म्हणजे ब्रेसलेट. हातात छान नाजूक असे ब्रेसलेट घातले की हात छान सुंदर दिसतो.
ब्रेसलेटमध्येही विविध प्रकार असतात. त्यापैकी काही प्रकार बाजारात आरामात आणि स्वस्तातही मिळतात. साडी असो वा ड्रेस हे प्रकार छान दिसतात. पाहा कोणते प्रकार आहेत.
लहान मुलांना तसेच तरुण मुलींना बेडेड ब्रेसलेट छान दिसते. वेस्टर्न ड्रेसवर हा प्रकार छान दिसतो. रंगीत, समरंगी अशा विविध प्रकारचे मिळतात.
चैन ब्रेसलेट्स सगळ्या वयोगटाच्या मुलींना छान दिसतात. मेटलचा वापर करुन हे ब्रेसलेट तयार केले जाते. दिसते मस्त आणि बाजारात आरामात उपलब्ध होते.
आणखी एक मस्त आणि लोकप्रिय प्रकार म्हणजे कफ ब्रेसलेट्स. हे ब्रेसलेट पूर्ण गोल नसते. त्याची टोकं जोडलेली नसतात. त्यामुळे ते वापरणे जास्त सोपे जाते. आरामात काढता येते.
चार्म ब्रेसलेट्स तरुणपिढीमध्ये प्रसिद्ध आहे. मेटलच्या चेनमध्ये चंद्र-सूर्य किंवा इतरही कोणत्या चिन्हांचे गोल अडकलेले असतात. रोजच्या वापरासाठी हा प्रकार अनेक जण वापरतात.
साधे- नाजूक बँगल ब्रेसलेट महिलांच्या हातावर फारच नाजूक आणि छान दिसते. हा प्रकार तसा सगळ्यांच्या ओळखीचा आहे. सगळ्या प्रकारच्या मटेरियलमध्ये हे ब्रेसलेट मिळते.
कॉर्ड्स ब्रेसलेट्स सुंदर असे विणलेले असतात. विविध रंगाचे दोरे एकत्र विणून हे ब्रेसलेट तयार केले जाते. कॉटन, नायलॉन किंवा इतरही मटेरियल वापरुन हे ब्रेसलेट तयार करतात.
बोलो ब्रेसलेट हा एक फारच सुंदर प्रकार आहे. अगदी नाजूक अशी चेन असते आणि त्याला मस्त असा खडा लावलेला असतो. तुम्हाला जर काही साध वापरायचं असेल तर हा प्रकार नक्की वापरा.