घर थंड ठेवणारे ६ इनडोअर प्लांट्स, उन्हाळ्यात 'ही' रोपं घरात ठेवाच- घरात वाटेल गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 19:41 IST2025-04-30T18:29:31+5:302025-04-30T19:41:57+5:30

उन्हाळ्याच्या दिवसांत घरातही खूप उष्ण वाटते. म्हणूनच घरातली उष्णता कमी करून घरात थोडे आल्हाददायक, थंड वाटण्यासाठी काही रोपं घरात आणून ठेवा. यामुळे घरातील उष्णता कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
पहिलं आहे स्नेक प्लांट. शॉर्ट किंवा टॉल अशा दोन्ही प्रकारातले स्नेक प्लांट तुम्ही घरात ठेवू शकता. यामुळे हवा थंड होण्यास मदत होईल. तसेच घरातले फंगल इन्फेक्शन शोषून घेण्यासाठीही स्नेक प्लांट उपयुक्त ठरते.
लवेंडर प्लांटही तुम्ही अधूनमधून घरात आणून ठेवू शकता. या रोपाला उन्हाची गरज असते. त्यामुळे भरपूर ऊन येणाऱ्या साऊथ फेसिंग खिडकीमध्ये तुम्ही हे रोप ठेवू शकता. याच्या सुगंधामुळे घरात डास येत नाहीत.
अनेक औषधी गुणधर्म असणारी कोरफड घर थंड, शांत ठेवण्यासाठीही उपयोगी ठरते.
चाैथं आहे आरिका पाम. घर थंड ठेवण्यासोबतच घराची शोभा वाढविण्यासाठीही आरिका पाम खूप छान आहे.
स्पायडर प्लांट घरात ठेवल्यानेही घर खूप आल्हाददायक वाटते आणि घराचा लूक बदलतो. घरातले प्रदुषित वायू शोषून घेण्यासाठीही स्पायडर प्लांट उपयोगी ठरते.
बांबू प्लांटही घरात खूप छान दिसते. शिवाय घरात पॉझिटीव्ह एनर्जी, गुडलक देणारं, भरपूर ऑक्सिजन देणारं रोप म्हणूनही बांबू प्लांट ओळखलं जातं.