1 / 8वाढलेलं वजन कमी करणं आजकाल सगळ्यांनाचं अतिशय (Worst Weight Loss Mistakes Women Make) महत्वाचे वाटते. वजन कमी करण्यासाठी अनेकजणी वेगवेगळ्या प्रकारचे उपायही करुन पाहतात. परंतु बऱ्याचवेळा चुकीची माहिती किंवा निष्काळजीपणामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. डाएट आणि एक्सरसाइज रोज करुनही वजन काही केल्या कमी होतच नाही. 2 / 8वजन कमी करताना अनेकजणी (6 Common Weight Loss Mistakes Women Make Avoid These To Get Slim) नकळतपणे काही लहान - मोठ्या चुका करतात. याच चुकांमुळे वजन कमी करण्यात अडथळा येतो. काही छोट्याछोट्या चुका वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मंदावतात किंवा थांबवतातही. यासाठीच वजन कमी करताना कोणत्या चुका करु नये ते पाहा. 3 / 8वजन कमी करताना अनेकजणी खूपच कमी कॅलरीज घेतात, पण यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो. शरीराला ऊर्जेसाठी एक ठराविक प्रमाणात कॅलरीजची गरज असते. जर वेटलॉससाठी खूपच कमी खाणं सुरू केलंत, तर शरीर चरबी जाळण्याऐवजी ती साठवायला सुरुवात करते. यासाठी योग्य पद्धत म्हणजे संतुलित आहार घेणं. ज्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स यांचा समावेश असतो. हे शरीरासाठी पोषक आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. 4 / 8पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास आणि मेटाबॉलिझमचा वेग वाढवण्यास मदत करतं. परंतु अनेकजणी दिवसातून पुरेसं पाणी पीत नाहीत, ज्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि फॅट बर्नची प्रक्रिया मंदावते. दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याची सवय लागवा. यामुळे पोट भरलेलं वाटेल आणि जास्त खाण्याची वाईट सवय टाळता येईल.5 / 8अपुऱ्या झोपेमुळे शरीरात कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो, जो शरीरात चरबी साठवण्याची प्रक्रिया सुरू करतो. जर तुम्ही दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेत नसाल, तर वजन कमी करणं कठीण होऊ शकतं. पुरेशी झोप घेतल्यास मेटाबॉलिजम संतुलित राहते आणि शरीर अतिरिक्त चरबी जाळण्यास सुरुवात करते. 6 / 8अनेक महिलांना वाटतं की फक्त कार्डिओ (जसं की धावणं, सायकलिंग) केल्यानं वजन कमी होतं. पण जर स्ट्रेंथ ट्रेनिंग (स्नायू बळकट करणारे एक्सरसाइज) नसेल, तर स्नायू कमजोर होतात आणि मेटाबॉलिझमचा वेगही कमी होतो. यासाठीच कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग यामध्ये संतुलन राखणं आवश्यक आहे, जेणेकरून चरबी जळेल आणि मसल्स मजबूत होतील. 7 / 8लो-फॅट किंवा डाएट असं लेबल लावलेले प्रोसेस्ड फूड्स पाहायला हेल्दी वाटतात, पण त्यामध्ये अनेकदा साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात, जे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. याऐवजी आहारात ताजी फळं, भाज्या, भरडधान्य आणि प्रोटीनचा समावेश करा, जे शरीरासाठी नैसर्गिक आणि फायदेशीर ठरतात. 8 / 8स्ट्रेसमुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढतं, जे चरबी साठवण्याची प्रक्रिया वेगाने वाढवत. त्यामुळे वजन कमी होण्यास अडथळा येतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगा किंवा आवडता छंद जोपासा. आनंदी आणि सकारात्मक राहिल्यास वजन कमी करणं अधिक सोपं आणि नैसर्गिक पद्धतीने करता येत.