By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:03 IST
1 / 10मॅच्युरिटी किंवा प्रगल्भता ही केवळ वयावर अवलंबून नसते तर ती तुमच्या विचारांवर आणि वागण्यावर अवलंबून असते. एका मॅच्युअर माणसाची १० लक्षणं समजून घेऊ. (10 Signs of a Mature Person)2 / 10मॅच्युअर माणूस छोट्या छोट्या गोष्टींवर चिडण्याऐवजी डोकं शांत ठेवून वागतो. अशा व्यक्तीचे आपल्या भावनांवर खूपच नियंत्रण असते.3 / 10स्वत:च्या चुका मान्य करणं आणि इतरांना दोष देणं टाळा. चूक मान्य करणं हे मोठ्या मनाचे लक्षण आहे.4 / 10प्रगल्भ व्यक्ती बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घेण्याला जास्त महत्व देते. त्यांना हे समजते की प्रत्येकवेळी आपलेच म्हणणे खरे असणे गरजेचे नाही.5 / 10प्रत्येक वादात जिंकणं गरजेचं नसतं. हे त्यांना उमजलेलं असते. जिथे आपली ऊर्जा वाया जाणार आहे अशा निरर्थक वादातून ते शांतपणे बाहेर पडणं पसंत करतात.6 / 10 समोरची व्यक्ती कोणत्या स्तरावर आहे किंवा तिचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत का , याचा विचार न करता प्रत्येकाशी आदरानं वागणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो.7 / 10मॅच्युअर माणसं मनात राग किंवा अढी धरून ठेवत नाहीत. ते इतरांना माफ करून आयुष्यात पुढे जाण्यावर विश्वास ठेवतात.8 / 10ते पैशांचा आणि वेळेचा वापर विचारपूर्वक करतात. क्षणिक सुखापेक्षा स्थैर्याला ते जास्त प्राधान्य देतात.9 / 10त्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी महागड्या वस्तू किंवा बडेजाव करण्याची गरज भासत नाही. ते जसे आहेत तसे राहण्याचतच त्यांना आनंद मिळतो.10 / 10आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. परिस्थिती बदलली की त्या बदलांचा स्वीकार करून स्वत:ला त्याप्रमाणे जुळवून घेण्याची लवचीकता त्यांच्याकडे असते.