Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 18:27 IST
1 / 7पुण्यातील खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस रेव्ह पार्टीच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा दोन तरुणी आणि पाच जण पार्टी करत होते. 2 / 7रेव्ह पार्टी जास्त चर्चेत आली ती रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या सहभागामुळे. पण, त्यांच्याशिवाय आणखी सहा जण त्या पार्टीमध्ये होते.3 / 7पोलिसांनी रविवारी (२७ जुलै) साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी खराडीतील स्टेबर्ड अझूर सूटमधील हॉटेलवर छापा टाकला. खोली क्रमांक १०२ मध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती.4 / 7खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांना या खोलीत ४१ लाख रुपये जप्त केले. त्याशिवाय खोलीत मादक पदार्थही आढळून आले.5 / 7पोलिसांनी २.७ ग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा, हुक्का पॉट आणि फ्लेवर, दारू आणि बिअरच्या बाटल्या, दहा मोबाईल आणि ४१ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. त्याचबरोबर पोलिसांनी दोन चार चाकी गाड्याही जप्त केल्या आहेत.6 / 7प्रांजल खेवलकरांसोबत रेव्ह पार्टी करणाऱ्या इतर सहा जणांची नावेही समोर आली आहे. निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५), समीर फकीर महमंद सय्यद (वय ४१), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२), श्रीपदा मोहन यादव (वय २७), तर ईशा देवज्योत सिंग (वय २२) आणि प्राची गोपाल शर्मा (वय २३) अशी रेव्ह पार्टीतील दोन्ही तरुणींची नावे आहेत.7 / 7रेव्ह पार्टीतील एक तरुणी औंध येथे राहते, तर दुसरी तरुणी म्हाळुंगे येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी एनडीपीएस कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.