शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपा कार्यालयात रेमडेसिवीरचं वितरण; गुजरातमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांविरोधात हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 2:26 PM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट धोकादायक आहे. या परिस्थितीत रुग्णांना बेड, ऑक्सिजन यांच्यासह रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याचं दिसून येत आहे.
2 / 10
देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असतानाच गुजरातमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उर्फ सीआर पाटील यांच्या कार्यालयत रेमडेसिविर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं. सीआर पाटील यांच्याविरोधात गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
3 / 10
काही दिवसांपूर्वी सीआर पाटील यांनी सूरतच्या कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शनचं वाटप केले होते. याचे फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. या प्रकारामुळे माजी काँग्रेस नेते परेश धनानी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
4 / 10
गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी नवसारी खासदार आणि गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आर पाटील यांच्याविरोधात हायकोर्टात ३६ पानांची जनहित याचिका दाखल केली आहे. यात गुजरात सरकार, सूरतचे आमदार हर्ष संघवी यांच्याविरोधात आवाज उठवला आहे.
5 / 10
भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी सूरतमध्ये रेमडेसिविरचे ५ इंजेक्शनचं वाटप केले होते. त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपा कार्यालयातून रेमडेसिविर इंजेक्शनचं वाटप झालेल्या प्रकाराबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
6 / 10
या याचिकेत सरकारने सीआर पाटील यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला आणि आपत्कालीन नियमांचे भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
7 / 10
गुजरातमध्ये बुधवारी ७ हजार ४१० कोरोना रुग्ण आढळले. तर ७३ लोकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूची संख्या ५ हजारापर्यंत पोहचली आहे. राज्यात बुधवारी २ हजार ६४२ रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
8 / 10
देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. गुजरातमध्येही रेमडेसिवीरची मोठी मागणी आहे, दरम्यान, गुजरातमधील भाजपच्या एका कार्यालयात हे इंजेक्शन मोफत देण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी गुजरात सरकारला घेरलं होतं.
9 / 10
'देशात रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे आणि सूरतमधील भाजप कार्यालयात ते मोफत वाटण्यात येत आहे. हा राजकीय तुटवडा आहे का?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाला विचारला होता.
10 / 10
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिविर या औषधाचा केला जात आहे. मात्र आता डब्ल्यूएचओने या औषधाच्या उपयुक्ततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अमेरिकन औषधनिर्माता कंपनी गिलिएड सायन्सच्या रेमडेसिवीर औषधाचा वापर भारतात केला जात आहे
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय