See Pic : २३ विश्वविजेतीपदं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूचा सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्टशी विवाह!

By स्वदेश घाणेकर | Published: January 7, 2021 09:34 AM2021-01-07T09:34:57+5:302021-01-07T09:36:21+5:30

जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन पंकज अडवाणीनं बुधवारी कुटुंबातील मोजकेच सदस्य व मित्रांच्या साक्षीनं मुंबईत सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सानिया शाददपुरी हिच्याशी लग्न केलं. ( Pic credit : cupcakeproductions13)

२३ विश्वविजेतीपदं नावावर असलेल्या पंकजनं सोशल मिडियावर त्याच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले.

पंकजनं १५ वेळा IBSF जागतिक बिलियर्स अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. त्याशिवाय जागतिक सांघिक बिलियर्स ( १), जागतिक स्नूकर अजिंक्यपद ( १५ रेड्स) तीन वेळा, ( ६ रेड्स) दोन वेळा, जागतिक सांघिक चषक आणि जागतिक सांघिक अजिंक्यपदही त्यानं नावावर केलं.

सानिया ही मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट आहे. तिनं शाहिद कपूरची पत्नी मिरा राजपूत कपूर हिच्यासाठी काम केलं आहे.