शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 20:46 IST

1 / 10
ओसियन डोडिन ही एक फ्रेंच व्यावसायिक टेनिसपटू आहे. ओसियन डोडिन हिचा जन्म २४ ऑक्टोबर १९९६ रोजी फान्सच्या लिल येथे झाला.
2 / 10
ओसियन डोडिनची खेळण्याची शैली अत्यंत आक्रमक असून, ती तिच्या शक्तिशाली सर्व्हिस आणि बेसलाइन फटक्यांसाठी ओळखली जाते.
3 / 10
डोडिनने २०१६ मध्ये कूप बँक नॅशनल येथे तिचे पहिले आणि एकमेव WTA टूर एकेरी विजेतेपद जिंकले.
4 / 10
२०२४ ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये तिने चौथ्या फेरीत (Round of 16) प्रवेश केला, जी तिच्या ग्रँड स्लॅम कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
5 / 10
डोडिन आपल्या कारकिर्दीत १७ पेक्षा जास्त ITF सर्किट एकेरी विजेतेपदे जिंकली आहेत.
6 / 10
डोडिनने डिसेंबर २०२४ मध्ये दीर्घकाळच्या कान आणि व्हर्टिगो या समस्येमुळे टेनिसमधून नऊ महिन्यांचा ब्रेक घेतला होता.
7 / 10
या नऊ महिन्यांच्या ब्रेकदरम्यान, तिने अनेक लोकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ब्रेस्ट ऑगमेंटेशन सर्जरी केली. टेनिस खेळत असताना अशी शस्त्रक्रिया करणारी ती कदाचित पहिली सक्रिय खेळाडू असल्याचे तिने सांगितले.
8 / 10
शस्त्रक्रियेनंतर तिने २०२५ मध्ये पुन्हा टूरवर पुनरागमन केले आहे. ती सध्या W35 रीम्स (Reims) स्पर्धेत खेळत असून, तिचा उद्देश ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या पात्रता फेरीत खेळण्याचा आहे.
9 / 10
तिने तिच्या आई-वडिलांसोबतच टेनिस खेळायला सुरुवात केली आणि नंतर तिचे वडील फ्रेडरिक डोडिन यांनीच तिला प्रशिक्षण दिले. सध्या ती फ्रान्समधीलच व्हिलनेव-डी'अस्क येथे राहते.
10 / 10
सर्व फोटो सौजन्य: ओसियन डोडिन (oceane_dodin) इन्स्टाग्राम अकाऊंट
टॅग्स :Tennisटेनिस