वर्ल्ड चॅम्पियन सावत्र बहिणीच्या प्रेमात; ११ वर्ष सगळं सुरू होतं, मुलगी प्रेग्नेंट झाली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:24 AM2023-02-21T11:24:46+5:302023-02-21T11:27:30+5:30

क्रीडा जगतातील सुपरस्टार्सनी जवळच्या नातेवाईक किंवा चुलत भावांसोबतही अफेअर होते. वर्ल्ड चॅम्पियन मिगुएल ऑलिव्हिएराला घरात जीवनसाथी सापडला. त्याने आपल्या सावत्र बहिणीशी लग्न केले.

क्रीडा जगतातील सुपरस्टार्सनी जवळच्या नातेवाईक किंवा चुलत भावांसोबतही अफेअर होते. वर्ल्ड चॅम्पियन मिगुएल ऑलिव्हिएराला घरात जीवनसाथी सापडला. त्याने आपल्या सावत्र बहिणीशी लग्न केले.

भारतात मोटो जीपी रेसची फारशी क्रेझ नाही. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे काही वर्षांपूर्वी मोटो जीपी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. हा इव्हेंट हिट झाला असला, तरी भारतात रेसिंग बाइक्सची फारशी क्रेझ नव्हती.

मोटो जीपीचा वर्ल्ड चॅम्पियन मिगुएल ऑलिवेरा याची लव्ह स्टोरी मजेशीर आहे. पोर्तुगालचा मिगुएल २०१५ मध्ये Moto GP चा वर्ल्ड चॅम्पियन बनला.

वर्ल्ड चॅम्पियन मिगुएल ऑलिव्हेराचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. ज्या लोकांना बाईक रेसिंग आवडते ते मिगुएलला चांगले ओळखतात.

पोर्तुगालच्या या सुपरस्टार बाइकरने आपला जीवनसाथी घरातच निवडला. मिगुएलचे त्याची सावत्र बहीण अँड्रिया पिमेंटासोबत ११वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

दोघांचे प्रेमप्रकरण बरेच दिवस चालले. यादरम्यान या मोटोजीपी स्टारची सावत्र बहीणही गरोदर राहिली. २०१९मध्ये दोघांनीही त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल कुटुंबियांना सांगितले होते.

इंस्टाग्रामवर एका अतिशय भावनिक पोस्टमध्ये मिगुएल ऑलिव्हेराने आपल्या चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. मोटोजीपी स्टार मिगुएल ऑलिव्हिरा यानेही या दोघांचे लग्न झाल्याचे स्पष्ट केले. याच्या काही आठवड्यांनंतरच त्याने चाहत्यांना मिगुएल ऑलिव्हेराच्या गरोदरपणाबद्दल माहिती दिली.