शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कबड्डीपटू दीपक हुड्डाच्या बायकोनं रचला इतिहास; बॉक्सिंगमध्ये भारतासाठी जिंकलं 'सुवर्ण पदक'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 6:12 PM

1 / 11
सध्या भारतात खेळल्या जात असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Boxing Championship) हरयाणाच्या हिसार येथून आलेल्या स्वीटी बुराने इतिहास रचला आहे.
2 / 11
महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील 81 किलो वजनी गटात स्वीटीने अंतिम फेरीत चीनच्या वांग लीनाचा 4-3 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. कबड्डीपटू दीपक हुड्डाची पत्नी असलेल्या स्वीटीने सुवर्ण जिंकून वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान पटकावला आहे.
3 / 11
आताच्या घडीला बॉक्सिंगच्या विश्वावर राज्य करणाऱ्या स्वीटीला एके काळी हा खेळ सोडावासा वाटला होता. पण 10 दिवसांनी तिच्या आयुष्याला कलाटणी दिली.
4 / 11
10 दिवसांच्या सरावानंतर तिने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेल्या पदकाने तिच्या पंचांना चालना मिळाली आणि पती दीपक हुड्डासोबत कबड्डी शिकलेल्या स्वीटीने बॉक्सिंगमधून बाहेर होण्याचा निर्णय बदलला.
5 / 11
हरयाणातील हिसार येथून आलेली 30 वर्षीय स्वीटी 2022 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. यामुळे ती खूप निराश झाली होती. तसेच ऑलिम्पिकला जाऊ न शकल्यामुळे ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती.
6 / 11
ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न हुकल्यानंतर तिने पती दीपक हुड्डाच्या सल्ल्यानुसार कबड्डी खेळण्याचा निर्णय घेतला होता. भारताचा कबड्डीपटू दीपक हुड्डा म्हणाला की, जेव्हा ती नाराज होती तेव्हा मी तिला कबड्डी खेळायला सांगितले कारण ती लहानपणापासूनच कबड्डीपटू आहे.
7 / 11
दीपक हुड्डाने सांगितले की, स्वीटी आणि मी लॉकडाऊन दरम्यान अपार्टमेंटमध्ये खूप कठोर प्रशिक्षण घेतले. 10-12 किमी चालल्यानंतर आम्ही आणखी प्रशिक्षण घ्यायचो.
8 / 11
लॉकडाऊनमध्ये थोडा दिलासा मिळाला की आम्ही संध्याकाळी सात वाजता स्टेडियममध्ये जायचो आणि चार तास सराव करायचो, असे हुड्डाने अधिक सांगितले.
9 / 11
स्वीटीने कबड्डीमध्ये आपली पकड निर्माण करायला सुरुवात केली होती पण ती त्यात जास्त रमत नव्हती. यानंतर स्वीटीने तिचे धुळ खात पडलेले ग्लोव्हज घातले आणि आशियाई चॅम्पियनशिपच्या 10 दिवस आधी सराव करून त्यात स्थान मिळवले.
10 / 11
2021 च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये स्वीटीने कांस्यपदक जिंकले आणि या पदकाने बॉक्सिंगबद्दलचा तिचा उत्साह पुन्हा जागृत केला आणि आता जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून तिने आपली नवीन ओळख निर्माण केली.
11 / 11
स्वीटीच्या या यशात तिचा पती दीपक हुड्डाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. कारण कबड्डीची तयारी केल्यामुळे तिचे शरीर अधिक मजबूत झाले,असे स्वतः स्वीटीचे मत आहे.
टॅग्स :boxingबॉक्सिंगKabaddiकबड्डीGold medalसुवर्ण पदकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी