शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:14 IST

1 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (८ ऑक्टोबर २०२५) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. या टप्प्याचा खर्च सुमारे १९ हजार ६५० कोटी इतका आला आहे.
2 / 8
'आज मुंबईची दीर्घ प्रतीक्षा संपली. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले. हे विमानतळ आशियातील सर्वात मोठे कनेक्टिव्हिटी हब बनेल,' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात व्यक्त केला.
3 / 8
सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत विकसित केलेला नवी मुंबई विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे.
4 / 8
मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून याला खूप महत्त्व आहे. मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी या नव्या विमानतळामुळे मोठा हातभार लागणार आहे.
5 / 8
नवी मुंबई विमानतळाची काही खास डिजिटल वैशिष्ट्ये आहेत. वाहन पार्किंग स्लॉटचे पूर्व-बुकिंग, ऑनलाइन बॅगेज ड्रॉप बुकिंग आणि इमिग्रेशन सेवा असे भारतातील हे पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ आहे.
6 / 8
विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) चे सीईओ अरुण बन्सल यांच्या मते, तुमच्या फोनवर कॅरोसेलवर तुमची बॅग कोणत्या क्रमांकावर आहे हे सांगणारा संदेशही येईल.
7 / 8
नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे कधीपासून सुरू होतील? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. याचे उत्तर असे की, नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होणार आहेत.
8 / 8
प्रवाशांसाठी ऑक्टोबरच्या अखेरीस तिकिट विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांची विमाने येथून उड्डाण करतील. या विमानांच्या गंतव्य स्थानानुसार फ्लाईट शेड्युल ठरवले जाईल.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी