शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:52 IST

1 / 8
भारताच्या सुरक्षा यंत्रणांना एक धक्कादायक पुरावा सापडला आहे. पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टर नासिर ढिल्लोन आणि भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​हे एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
2 / 8
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा ​​पाकिस्तानात नासिर ढिल्लोनच्या संपर्कात होती आणि तिने त्याच्यासोबत एक पॉडकास्ट मुलाखतही केली होती.
3 / 8
रिटायर्ड झाल्यानंतर नासिर ढिल्लन युट्यूबवर एक्टिव्ह झाला. त्याचं चॅनल वेगाने लोकप्रिय झालं परंतु तपासात असं दिसून आलं की तो भारतातील युट्यूबर्सशी संबंध निर्माण करून आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्यासाठी काम करत होता.
4 / 8
नासिर ढिल्लोन सर्वप्रथम भारतीय युट्यूबर्सशी मैत्री करायचा, नंतर त्यांची पाकिस्तानी आयएसआय एजंट्सशी ओळख करून द्यायचा. यानंतर तो त्यांना भारतीय सैन्य आणि सुरक्षा संस्थांशी संबंधित गोपनीय माहिती गोळा करण्याचं काम देत असे. ही प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक पार पाडली जात होती जेणेकरून कोणताही संशय येऊ नये.
5 / 8
तपास यंत्रणांना नासिर ढिल्लोन आणि दानिश यांच्यातील संपर्काचे पुरावे देखील सापडले आहेत. आता त्यांच्यातील नेमके संबंध आणि परिणाम तपासले जात आहेत. युट्यूबर्सद्वारे संवेदनशील माहिती पाकिस्तानला देण्यात आली का? याचाही शोध घेतला जात आहे.
6 / 8
भारतीय सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की, पाकिस्तानच्या पोलीस विभागातील शेकडो रिटायर्ड अधिकारी एका संघटित हेरगिरी नेटवर्कचा भाग आहेत, जे भारतातील युट्यूबर्सना लक्ष्य करून माहिती गोळा करण्यात गुंतलेले आहे.
7 / 8
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली असलेल्या ज्योती मल्होत्रा ​​हिला ९ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं जाईल.
8 / 8
हे संपूर्ण प्रकरण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक मोठा धोका मानलं जात आहे. तपास यंत्रणा आता भारतात एक्टिव्ह असलेल्या इतर युट्यूबर्सच्या कारवायांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत, ज्यांचे पाकिस्तानी संबंध असल्याचा संशय आहे.
टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राPakistanपाकिस्तानPoliceपोलिस