ऐकावं ते नवलच! वेब सीरिज पाहून स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; भिकाऱ्याची हत्या केली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:04 IST
1 / 8विम्याची रक्कम लाटण्यासाठी एका जणाने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने हा संपूर्ण कट एक वेब सीरिज पाहून रचला. 2 / 8आरोपीने एका बेवारस भिकाऱ्याची हत्या केली आणि स्वतःचा मृतदेह असल्याचे भासवले. मात्र, त्याचा डाव फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 3 / 8राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील ही घटना आहे. १ डिसेंबर रोजी बांसवाडा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर झेरबारी गावाजवळ एका अवजड वाहनाने चिरडलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्या मृतदेहची ओळख पटवणेदेखील अवघड होते. 4 / 8मृतदेहाजवळ एक बॅग होती. त्यात ओळखपत्र आणि काही कागदपत्रे होती. त्यावर नरेंद्र सिंह रावत याचे नाव होते. यानेच सगळा बनाव रचला होता. तो सध्या फरार आहे. 5 / 8भिकाऱ्याची केली हत्या - पोलिसांनी नरेंद्र याच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलाविले. मात्र, त्यांनी मृतदेह त्याचा असल्याचे फेटाळले. त्यामुळे पोलिस सतर्क झाले. त्यांनी तपास सुरू केला. भैरूलाल नावाचा एकजण पोलिसांच्या संपर्कात आला. त्याने सर्व माहिती दिली. 6 / 8पोलिसांना सापडलेला मृतदेह हा तुफानसिंह नावाच्या भिकाऱ्याचा आहे. त्याला मारुन मृतदेहाला नरेंद्रची ओळख देण्याची आयडीया एका वेब सीरिजवरून सुचली, असे त्याने सांगितले.7 / 8असा रचला कट - एका बेवारस व्यक्तीचा शोध भैरुलाल आणि नरेंद्र यांनी सुरू केला. नरेंद्रला तुफानसिंह सापडला. त्याला नोकरी देण्याचे आमिष दाखवले आणि सोबत आणले. त्याला खूप दारू पाजली. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला रस्त्यावर झोपवून ट्रेलरखाली चिरडले. या ट्रेलरच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.8 / 8मृत्यूचा बनाव कशासाठी? नरेंद्रवर प्रचंड कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचण्याची योजना आखली. विम्याची रक्कम लाटून कर्ज फेडण्याची त्याची योजना होती.