शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशविदेशात योगलाट

By admin | Published: June 21, 2015 12:00 AM

1 / 13
कंबोडियातील मंदिरांमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
2 / 13
जपानमध्येही योग दिन साजरा करण्यात आला.
3 / 13
योग करताना मेक्सिकोतील रहिवासी
4 / 13
भारत - चीनमधील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये बहुधा योगही मोलाची भूमिका बजावेल. चीनमध्येही रविवारी योग दिनानिमित्त योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
5 / 13
योग करताना मुंबई विभागातील नौदलाचे कर्मचारी
6 / 13
कोलकाता येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी योग दिनानिमित्त आयोजित योग शिबीरात सहभाग घेत योगासन करुन दाखवली.
7 / 13
कच्छच्या वाळवंटात देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी योगदिनात सहभाग घेतला.
8 / 13
आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवरील नौदलाच्या जवानांनी शिपवरच योग करत योगदिनाच्या सोहळ्यात सहभाग घेतला.
9 / 13
योग शिबीरात सहभागी झालेले कारगिलमधील सैन्याचे जवान.
10 / 13
सियाचीन येथील गोठवणा-या थंडीतही योग दिनात सहभागी झालेले जवान.
11 / 13
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बंगळुरुतील योग शिबीरात सहभाग घेत योग करुन फिट राहण्याचा संदेश दिला.
12 / 13
योग दिनानिमित्त नागपूरमध्ये आयोजित योगसोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याप्रसंगी फडणवीस यांनी स्वतःदेखील विविध योगासनं केली.
13 / 13
दिल्लीतील राजपथावर पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात ३५ हजार नागरिक उपस्थित होते.त्यामुळे दिल्लीतील राजपथ रविवारी योगपथ झाले होते.