शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शरीर संबंध ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी ५००० मागितले, IT इंजिनिअरच्या पत्नीचा खुलासा आला...'गंमतही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:11 IST

1 / 8
बंगळुरुच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपली पत्नी शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी आपल्याकडून ५००० रुपये मागत असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. प्रत्येकजण या महिलेला ट्रोल करत होता, दुषणे देत होता. परंतू, आता पत्नीची बाजू आली आहे. तिने आयटी इंजिनिअर पतीवर मारहाण, हुंड्यासाठी छळ आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच पतीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
2 / 8
आयटी इंजिनिअरने त्याच्या पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या तरुणाने त्याच्या सासरच्या लोकांवर मानसिक आणि शारीरिक छळाचे खळबळजनक आरोप केले आहेत. लग्नाच्या तीन वर्षांनंतरही त्याची पत्नी त्याच्यासोबत व्यवस्थित राहत नाही आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दररोज ५,००० रुपये मागते, असा दावा तक्रारदाराने तक्रारीत केला आहे.
3 / 8
लग्न १४ ऑगस्ट २०२२ रोजी झाले होते. लग्नाआधीच पत्नी आणि तिच्या आईने पैशांची मागणी करायला सुरुवात केली. लग्नाआधी पत्नीच्या आईने खात्यात ३ लाख रुपये ट्रान्सफर केले आणि लग्नाच्या खर्चासाठी ५०,००० रुपये रोखही घेतले. लग्नानंतरही मागण्या आणि छळ सुरूच राहिला होता, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
4 / 8
लग्नापासून वैवाहिक जीवन जगले नाही. जेव्हा जेव्हा तो शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा पत्नी त्याला आत्महत्या करण्याची धमकी द्यायची आणि मृत्यूची चिठ्ठी लिहून ब्लॅकमेल करायची. पत्नीने त्याच्या गुप्तांगांवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही पतीने केला आहे.
5 / 8
या सर्व आरोपांवर पत्नीचे उत्तर आले आहे. मला तो नीट खायला देत नव्हता, घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देत नव्हता, तर शरीर संबंध ठेवण्यासाठी पती दर दिवसाला ५००० रुपये देत होता असे कसे सांगू शकतो, असा सवाल तिने केला आहे. पती तिला मारहाण करतो आणि मोलकरणीसारखे वागवतो, असे आरोप तिने केले आहेत.
6 / 8
सासूने बेडरूममध्ये कॅमेरा बसवण्याचा सल्ला दिला आणि घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणला होता. इंजिनिअर पतीने तिने केलेल्या गंमती रेकॉर्ड केल्या आणि व्हिडिओ एडिट करून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या दिराने तर पत्नीला गर्भवती कर मग ती कुठेही जाणार नाही, असा सल्ला दिला होता, असा गोप्यस्फोट तिने केला आहे. अशा वातावरणात मी मुलांना कसे जन्म देऊ शकते, असाही सवाल तिने केला आहे.
7 / 8
तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ती तिच्या आईच्या घरी गेली, पण नंतर परत आली. तिला वाटले की आपण परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ शकतो, कारण पालकांनी त्यांचे लग्न करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. इतर प्रत्येक महिलेप्रमाणे, मलाही चांगल्या परिस्थितीची आशा होती.', असे तिचे म्हणणे आहे.
8 / 8
पत्नीने पतीविरोधात व्यालिकवल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, परंतू पोलिसांनी ती तेव्हा विचारात घेतली नाही असा आरोपही तिने केला आहे. आता पतीच्या तक्रारीवरून पत्नीला पोलिसांनी पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी बोलविले होते. तिथे तिने वैवाहिक संबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिला.
टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिपBengaluruबेंगळूर