संसद परिसरात जखमी झालेले भाजपचे खासदार प्रताप सारंगी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:48 IST
1 / 7केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावरून संसदेत घमासान सुरू आहे. काँग्रेसने संसद परिसरात आंदोलन केल्यानंतर भाजपच्या आमदारांनीही काँग्रेसविरोधात निदर्शने केली. दरम्यान, दोन्हीकडचे खासदार आमने-सामने आल्यानंतर झटापट होऊन भाजपचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले.2 / 7विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ढकलल्याचा आरोप भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी केला. ओडिशातून येत असलेल्या प्रताप सांरगी यांचा प्रवास आरएसएस प्रचारक ते माजी केंद्रीय मंत्री असा राहिलेला आहे. सध्या ते खासदार आहेत.3 / 7प्रताप सारंगी यांचा जन्म ४ जानेवारी १९५५ रोजी बालासोर जिल्ह्यातील गोपीनाथपूर येथील ब्राह्मण कुटुंबात झाला. १९७५ मध्ये त्यांनी उत्कल विद्यापाठाशी सलग्नित मोहन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.4 / 7प्रताप सारंगी यांना लहानपणापासूनच आध्यात्माची गोडी लागली. त्यांना रामकृष्ण मठाचे साधू व्हायचे होते. त्यांनी पश्चिम बंगालमधील रामकृष्ण पंथाच्या बेलूर मठाला अनेकदा भेट दिली. आईच्या आग्रहामुळे प्रताप सारंगी आपल्या गावी परतले. त्यानंतर ते सामाजिक कार्यात सामील होऊ लागले.5 / 7खासदार आणि आमदार बनण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केले. प्रताप सारंगी हे दुसऱ्यांदा खासदार बनले आहेत. ओडिशातील बालासोर लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला होता.6 / 7२०१९ मध्ये ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री बनले. पण, २०२१ पर्यंतच त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मात्र त्याचा समावेश करण्यात आला नाही.7 / 7खासदार बनण्यापूर्वी प्रताप सारंगी हे २००४ आणि २००९ असे दोन वेळा ओडिशातील नीलगिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बालासोर आणि मयूरभंज या आदिवासींचे वास्तव्य असलेल्या भागात त्यांनी शाळा सुरू केल्या आहेत.