शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 8:47 PM

1 / 10
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, काही महिने आधीपासूनच सर्वपक्षीयांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती. आता निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्यानंतर बंगालमधील राजकीय वातावरण आणखीनच तापताना दिसत आहे.
2 / 10
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे राज्य खालसा करण्याची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ता खेचून आणण्यासाठी भाजप नेते, खासदार, आमदार कंबर कसून तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
3 / 10
ममता बॅनर्जी आपल्या साधेपणाने पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यातही ममता बॅनर्जी आघाडीवर असतात. ममता बॅनर्जी यांचे राहणीमान साधे असल्याचे पाहायला मिळते.
4 / 10
ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती आहे? त्यांचेकडे किती सोने आहे? ममता बॅनर्जी यांचे शिक्षण किती? या सर्वांबाबत अनेकांना उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. ममता बॅनर्जी यांनी आपल्या संपत्तीबाबत प्रतिज्ञापत्रात माहिती दिली होती. (Mamta Banerjee Property And Gold)
5 / 10
ममता बॅनर्जी यांचा जन्म ५ जानेवारी १९५५ रोजी झाला असून, त्या उच्चशिक्षित आहेत. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता विद्यापीठातून एमए केले आहे. त्याचबरोबर त्यांनी जोगेश चंद्र चौधरी महाविद्यालयातून एलएलबी आणि बीएडचे शिक्षण घेतले.
6 / 10
ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ३० लाख ४५ हजार रुपयांची संपत्ती आहे. यात १८ हजार रुपये रोख असून, बँक खात्यात सुमारे २७ लाख रुपये आहेत. ममता बॅनर्जी यांनी एकाला सुमारे पाच हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. तसेच सुमारे २६ हजार रुपयांचे सोने आहे.
7 / 10
यासह ममता बॅनर्जी यांच्याकडे २ लाख १५ रुपयांची मालमत्ता आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर एकही घर किंवा वाहन नाही. याशिवाय त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही.
8 / 10
ममता बॅनर्जी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ममता बॅनर्जी यांनी लहानपणापासूनच आईला मदत करण्यास सुरुवात केली. राजकारणात येण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी स्टेनोग्राफर, शालेय शिक्षिका, एवढेच नव्हे तर सेल्सगर्ल म्हणूनही काम केले आहे.
9 / 10
ममता बॅनर्जी आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देतात, असे सांगितले जाते. तेलकट, चमचमीत पदार्थाचे सेवन त्या करत नाहीत. दररोज चार ते पाच कि.मी. चालण्याचा नेम ममता बॅनर्जी मोडत नसल्याचे सांगितले जाते.
10 / 10
दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने एक मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आमदारांना तिकीट दिले जाणार नाही, असा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक समितीने घेतला आहे.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१tmcठाणे महापालिकाGoldसोनंElectionनिवडणूकPoliticsराजकारण