शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 23:09 IST

1 / 5
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस परतीच्या पावसाने देशातील अनेक भागांना तडाखा दिला होता. दरम्यान, आता ऑक्टोबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज हा शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढवणारा आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उष्णताही अधिक राहणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही देशात अधिक पाऊस पडला होता. तसाच तो ऑक्टोबर महिन्यात पडणार आहे.
2 / 5
हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळी ऑक्टोबर महिन्यात मागच्या ५० वर्षांतील सरासरीपेक्षा ११५ टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापणीस आलेल्या पिकांचं नुकसान होऊ शकतं.
3 / 5
शेतकऱ्यांनी खरिपातील भात, कापूस, सोयाबीन, मका, डाळ इत्यादी पिकांची कापणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडल्यास कापलेल्या पिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यातच यावेळी मान्सून उशिरा माघारी परतल्याने सप्टेंबर महिन्यातही अधिक पाऊस पडला होता. त्यामुळेही देशात काही भागात पिकांचं नुकसान झालं होतं.
4 / 5
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा ११.६ टक्के अधिक पाऊस पडला. तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ९ टक्के आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा १५.३ टक्के अधिक पाऊस पडला होता. आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
5 / 5
मात्र काही बाबतीत ऑक्टोबर महिन्यातील पाऊस फायदेशीर ठरणार आहे. या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढणार आहे. तसेच जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा वाढलेली आर्द्रता आणि सूर्याच्या उष्णतेमुळे तापमानही अधिक असेल.
टॅग्स :weatherहवामानRainपाऊसIndiaभारत