शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विजय दिवस: भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले तो दिवस

By मोरेश्वर येरम | Published: December 16, 2020 2:07 PM

1 / 6
१६ डिसेंबर हा दिवस आपण 'विजय दिवस' म्हणून साजरा करतो. कारण याच दिवशी १९७१ साली भारताने पाकिस्तानविरुद्धची लढाई जिंकली होती. पण या युद्धाच्या काही रंजक गोष्टी देखील आहे. त्याची माहिती घेऊयात...
2 / 6
भारत आणि पाकिस्तानमध्ये ६ डिसेंबर १९७१ साली युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध १३ दिवस चाललं आणि इतिहासातील सर्वात कमी दिवसांचं युद्ध म्हणून याची नोंद झाली. पाकिस्तानने भारतासमोर १६ डिसेंबर रोजी शरणागती पत्करली होती.
3 / 6
बांगलादेशसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला असला तरी भारतीय लष्कराच्या कामगिरीमुळे लष्करातील प्रत्येक जवानासाठी 'विजय दिवस' अभिमानाचा दिवस ठरला.
4 / 6
पाकिस्तानसोबतच्या १४ दिवसांच्या लढ्यानंतर पूर्व पाकिस्तानमधील लेफ्टनंट जनरल एके नियाझी यांच्या नेतृत्त्वाखालील सैन्याने शरणागती पत्करली. भारताने बांगलादेशला दिलेलं वचन पाळलं आणि नव्या देशाची निर्मिती झाली.
5 / 6
पाकविरुद्धच्या विजयानंतर देशात विजयाचे सेलिब्रेशन केले गेले. त्यासाठी या लढ्याचे साक्षीदार असलेले ५८ सैनिक आणि बांगलादेशचे लष्करी अधिकाऱ्यांना भारताने निमंत्रित केले होते. कोलकातामध्ये 'विजय दिवस' साजरा करण्यात आला होता.
6 / 6
भारतीय लष्कराने जीवाची बाजी लावून पाकविरुद्ध नेटाने लढा देऊन विजय प्राप्त केला होता. पाकसह संपूर्ण जगाला यावेळी भारताच्या लष्करी ताकदीचे आणि सामर्थ्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे भारतासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. यासाठीच आजचा दिवस दरवर्षी 'विजय दिवस' म्हणून देशात साजरा केला जातो.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश