ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळुरुत राहत्या घरी निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 16:22 IST
1 / 7मंगळवारी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली2 / 7गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. 3 / 755 वर्षीय गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. 4 / 7गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. हत्येविरोधात शहरात मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.5 / 7गौरी लंकेश यांच्या आई इंदिरा लंकेश यांना अंत्यदर्शन घेताना अश्रू अनावर झाले होते. 6 / 7बंगळुरुमधील रवींद्र कलाक्षेत्र कल्चरल सेंटरमध्ये अंत्यदर्शनासाठी मृतदेह ठेवण्यात आला होता.7 / 7पोलिसांनी जवळपास 33 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असून एका सीसीटीव्हीत एक व्यक्ती कैद झाली असून त्याच्यावर पोलिसांना संशय आहे. या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं, तसंच अंगावर काळे कपडे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे