शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मातृत्व आणि कर्तव्याचा मिलाफ; जवान पती सीमेवर तैनात, पोलीस पत्नी चिमुकल्यासह ऑन ड्युटी

By बाळकृष्ण परब | Updated: November 9, 2020 15:01 IST

1 / 5
पती देशसेवेसाठी सीमेवर तैनात, पदरी १० महिन्यांचा मुलगा अशा परिस्थितीत एक महिला पोलीस कर्मचारी कर्तव्याला प्राधान्य देत खाकी परिधान करून आपल्या १० महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन कर्तव्य बजावत असल्याची बाब समोर आली आहे.
2 / 5
पूनम असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ती आग्रा पोलीस दलात तैनात आहे. सध्या ती न्यू आग्रा ठाण्यात कर्तव्यावर आहे. पूनम पोलीस ठाण्यामध्ये आपल्या १० महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन आपले काम करते. मातृत्व आणि कर्तव्याची सांगड घालणाऱ्या पूनमची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
3 / 5
मुळची अलिगड येथील असलेल्या पूनमची नियुक्ती पोलीस लाईनमध्ये होती. तिचा मुलगा सहा महिन्यांचा असल्यापासून ती आपले कर्तव्य मुलाला सोबत घेऊन बजावत आहे. खाकीप्रति असलेले तिचे समर्पण पाहून तिची बदली आग्रा येथील न्यू आग्रा येथे करण्यात आली. पूनम आपल्या कामाला सुरुवात करते तेव्हा तिचा मुलगा टेबलावर बसून खेळत असतो. मुलगा सोबत असला तरी पूनम कधीही आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होऊ देत नाही.
4 / 5
पूनम हिच्या कामाचे कौतुक ठाणेदार उमेशचंद्र त्रिपाठी यांनी केले आहे. ते सांगतात. पूनम पूर्ण निष्ठेने आपले काम करते. दररोज ती आपल्या मुलासह महिला हेल्पलाइनमध्ये आपला मुलगा आयुष याच्यासह येते. त्यानंतर मुलाच्या हाती खेळणी देऊन स्वत: आपल्या कर्तव्यामध्ये गुंतून जाते.
5 / 5
पोलील ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह इथे येणाऱ्या व्यक्तीसुद्धा मा्झ्या मुलासोबत प्रेमाने वागतात. अशा व्यक्तींकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे माझाही आत्मविश्वास वाढतो, असे पूनम सांगते. माझे पती सैन्यात आहेत. ते सध्या सीमेवर तैनात आहेत. तर इथे मी खाकी वर्दी परिधान करून कर्तव्य बजावते, असे तिने सांगितले.
टॅग्स :PoliceपोलिसFamilyपरिवारIndian Armyभारतीय जवानUttar Pradeshउत्तर प्रदेश