शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 4:34 PM

1 / 12
संयुक्त अरब अमिरातमध्ये कायदेशीर खटल्यांमध्ये अडकलेले तेथील सर्वात मोठ्या औषध कंपनीचे मालक बी आर शेट्टी कंगाल होण्याच्या वाटेवर आहेत.
2 / 12
चहुबाजुंनी संकटांनी वेढल्याने ते सध्या भारतात परतले आहेत.
3 / 12
मुळचे भारतीय असलेल्या शेट्टी यांची अब्जावधीची संपत्ती आहे. मात्र, त्यांची कंपनी पाच अब्ज डॉलरच्या कर्जाखाली अडकली आहे. तर शेट्टी यांच्याविरोधात फसवणूक केल्याची चौकशीही सुरु आहे. यामुळे त्यांच्या कंपनीला शेअर बाजारामध्ये ब्लॉक करण्यात आले आहे.
4 / 12
अरेबियन बिझनेस या वेबसाईटला एका सूत्राने ही माहिती दिली आहे. त्यांच्या एनएमसी हेल्थ आणि अमिरातीतल्या कंपन्यांविरोधात सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे शेट्टी काही महिन्यांपासून अमिरातमधून गायब झाले आहेत. त्यांच्या कंपन्यांविरोधात कमीतकमी पाच प्रकरणांवर चौकशी सुरु आहे.
5 / 12
युएईमध्ये हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये गडगंज संपत्ती आणि नाव कमावणाऱे ७७ वर्षींय शेट्टी हो भारतीय आहेत. त्यांनी १९७० मध्ये एनएमसी हेल्थ कंपनी स्थापन केली होती.
6 / 12
या कंपनीने एवढी प्रगती केली की ती २०१२ मध्ये लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंद झाली. त्याआधी या कंपनीने अमिरातमध्ये पाय पसरले होते. शेट्टी यांनी केवळ ८ डॉलर घेऊन युएई गाठली होती. त्यांनी मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह म्हणून काम केले होते.
7 / 12
त्यांनी १९८० मध्ये अमिरातच्या सर्वात जुन्या रेमिटेंस बिझनेस युएई एक्सचेंजची सुरुवात केली होती. यूएई एक्सचेंज, युकेची एक्सचेंज कंपनी ट्रॅव्हलेक्स आणि अन्य काही पेमेंट सोल्यूशन्स कंपन्यांनी शेट्टी यांच्या फिनब्लर या कंपनीसोबत काम केले आहे. यानंतर २०१८ मध्ये या कंपन्या सार्वजनिक करण्यात आल्या.
8 / 12
शेट्टी यांनी हेल्थकेअर, फायनान्शिअलशिवाय हॉस्पिटॅलिटी, फूड अँड बेव्हरेजेस, रिअल इस्टेटमध्येही नशीब आजमावले होते.
9 / 12
शेट्टी यांनी दुबईची प्रसिद्ध इमारत बुर्ज खलिफामध्ये दोन मजले घेतले होते. त्यांच्या एवढ्या अजस्त्र साम्राज्याला एका अहवालाने उद्ध्वस्त केले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मड्डी वॉटर रिसर्चचे संस्थापक आणि लेखक कारसन ब्लॉक यांनी त्यांच्या एका अहवालामध्ये एनएमसीची पोलखोल केली आणि संपत्त्यांचा खोटा आकडा देणे, संपत्या ढापण्याचा आरोप लावला होता.
10 / 12
यानंतर केवळ तीन महिन्यांत शेट्टी यांच्या कंपनीला लंडनच्या शेअर बाजारातही बंदी आणण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच याची घोषणा करण्यात आली. त्यांच्या या कंपनीवर केवळ ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
11 / 12
युएई एक्सचेंजने या आठवड्यापासून सर्व शाखा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नवीन व्यवहार बंद केले आहेत. कारण तेथील केंद्रीय बँकेने तपास सुरु असल्याची घोषणा करत संचालकांचीही चौकशी करण्याचे स्पष्ट केले.
12 / 12
शेट्टी यांच्या मालकीचे जगातील सर्वात उंच इमारतीमध्ये दोन मजले आहेत. तसेच पाम जुमेरियामध्ये अलिशान बंगला आहे.
टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीfraudधोकेबाजीDubaiदुबई