Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:59 IST
1 / 9मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्यास सुरुवात केली आहे. हा कर ५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. ट्रम्प यांना आधी या निर्णयामुळे अमेरिकेचा फायदा होईल असे वाटले होते. पण, त्यांचा डाव पालटल्याचे दिसत आहे. 2 / 9भारत, चीन आणि रशियाने ट्रम्प यांच्या कराला एकमताने विरोध केलाय. मागील काही दिवसांपासून या तिनही देशांचे राष्ट्राध्यक्ष संपर्कात आहेत.3 / 9दरम्यान, पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून भारत आणि चीनमधील थेट विमान सेवा सुरू होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. 4 / 9२०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. तब्बल पाच वर्षांनंतर, दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारण्यास सुरुवात झाली आहे.5 / 9काल भारत सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. २०२० पासून थेट टीनला ही विमानसेवा बंद होती.6 / 9ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान भारत आणि चीनमधील थेट विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. यामुळे पुन्हा एकदा चीन आणि भारताचे संबंध सुधारणार असल्याचे बोलले जात आहे. 7 / 9'भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या करामुळे भारताने चीनबाबत थोडी मवाळ भूमिका घेतली आहे.8 / 9 'डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने भारताविरुद्ध घेतलेल्या टॅरिफ उपाययोजनांचा विपरीत परिणाम होऊ शकतो, कारण त्यामुळे भारत आणि चीनमधील व्यापार संबंध सुधारत आहेत, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला.9 / 9सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत जॉन बोल्टन म्हणाले, 'ट्रम्प यांनी भारताविरुद्ध लावलेले शुल्क रशियाला दुखावण्याच्या उद्देशाने आहे, परंतु यामुळे भारत रशियाच्या जवळ येऊ शकतो आणि चीन या शुल्कांना विरोध करेल.